Panchayat Season 4 Release Date: 'पंचायत'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. प्राईम व्हिडीओनं 'पंचायत' सीझन 4 ची रिलीज डेट जाहीर केली आहे. ओटीटीवरची गाजलेल्या या वेब सीरिजचा पहिला सीझन 2020 मध्ये आली होती. त्यानंतर या वेब सीरिजला पाच वर्ष पूर्ण झाली आहे. त्यामुळे आजच्या या खास दिवशी निर्मात्यांनी चौथ्या सीझनची रिलीज डेट जाहीर करून टाकली आहे.
'पंचायत' सीझन 4 कधी रिलीज होणार?
'पंचायत' सीझन 4 जुलै महिन्यात रिलीज करण्यात येणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे. 2 जुलैपासून प्राईम व्हिडीओवर 'पंचायत' सीझन 4 प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तुम्ही तुमच्या लाडक्या सचिवजींसोबतच सर्व पात्रांना भेटू शकणार आहात.
पुन्हा एकदा इमोशनल ड्रामा आणि कॉमेडीचा हंगामा
तीन अवॉर्ड विनिंग आणि ओटीटीवर जबरदस्त धुमाकूळ घालणारी 'पंचायत' या सीरिजनं प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलं आहे. या सीरिजची साझी-सरळ-सोपी पण मनाला आणि काळजाला भिडणारी कहाणी प्रेक्षकांना खूपच आवडली. तसेच, या सीरिजमधली पात्र अत्यंत साधी आणि त्यांचा अभिनय तर आपलंस करणारा. त्यामुळे चाहते या सीरिजच्या आगामी सीझनची आतुरतेनं वाट पाहत आहेत. अशातच आता रिलीज डेट जाहीर झाल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. 'पंचायत' सीझन 4 मध्ये अनुभवता येणार ड्रामा, लाफ्टर आणि इमोशनल मुव्हमेंट्सची मेजवाणी.
दरम्यान, 'पंचायत' सीझन 4 मध्ये जीतेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, सान्विका, दुर्गेश कुमार, सुनीता राजवार आणि पंकज झा यांसारखे स्टार्स दिसणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :