Panchayat Season 4: ओटीटीवरील 'पंचायत' (Panchayat Season 4) ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. आतापर्यंत या सीरिजचे तीन भाग आले असून तिन्ही भागांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. 'पंचायत'चा सचिव असो की प्रधान, प्रेक्षक या मालिकेतील प्रत्येक पात्राशी स्वत:ला जोडू शकतात.नुकतच या सीरिजचा तिसरा सीझनही रिलीज झाला होता. त्यानंतर चाहते या सीरिजच्या चौथ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. 


नुकतच पंचायतच्या चौथ्या सीझनविषयी मोठी अपडेट समोर आलेली आहे. या सीरिजमधील सचिव, प्रधान, प्रल्हाद चा अशा अनेक पात्रांवर प्रेक्षकांनी अगदी भरभरुन प्रेम केलं. तिसऱ्या सीझननंतर चौथा सीझन कधी येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, हा सीझन 2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. दरम्यान येत्या 25 ऑक्टोबर पासून या सीरिजच्या शुटींगला सुरुवात होणार असल्याचीही माहिती समोर आलेली आहे. 


पंचायत 4 विषयी मोठी अपडेट


दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा यांनी आधीच खुलासा केला आहे की त्यांनी पंचायत सीझन 4 आणि 5 वर काम सुरू केले आहे. स्क्रिप्टवर काम सुरू केले आहे. आता रिपोर्टनुसार, नवीन सीझनचे शूटिंग सुरू करण्यासाठी निर्माते पावसाळा संपण्याची वाट पाहत होते. नवभारत टाइम्सच्या एक्सक्लुझिव्ह रिपोर्टनुसार, नवीन सीझन 2026 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बॉलिवुड हंगामाच्या रिपोर्ट्सनुसार,  येत्या 25 ऑक्टोबरपासून सीरिजच्या शुटींगला सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  मात्र, 'पंचायत 4' कधी येणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याशिवाय, या मालिकेचे शूटिंग ऑक्टोबर 2024 मध्ये मध्य प्रदेशमध्ये होण्याची शक्यता आहे.


काय असेल 'पंचायत 4'ची स्टोरी लाईन?


जितेंद्र कुमार, सान्विका, नीना गुप्ता, रघुवीर यादव यांसारख्या स्टार्सनी 'पंचायत 3' मध्ये काम केले आहे. गेल्या तीन सीझनमध्ये फुलेरा गावात प्रमुख होण्यासाठी लढत झाली. 'पंचायत 4'ची कथा निवडणुकीभोवती फिरणार असून यावेळी रिंकी आणि सेक्रेटरीचा रोमान्स फुलणार की नाही याचीही उत्सुकता आहे. तसेच प्रल्हाद चा निवडणुकीमध्ये सहभागी होणार की नाही हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल. ही सीरिज आणखी मनोरंजक करण्यासाठी आणखी नवे कलाकार जोडले जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. 


ही बातमी वाचा : 


Amruta Khanvilkar : आता अमृता खानविलकरही म्हणते, 'लाडक्या बहिणींचं लाडकं सरकार'; पण लोणच्याच्या जाहिरातीवरुन ट्रोल