Amruta Khanvilkar : विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्याआधी सरकारकडून त्यांच्या योजनांचा जोरदार प्रचार करण्यात आला. अनेक योजना विधानसभा निवडणुकांच्या महायुतीच्या सरकारने अंमलात आणल्या आहेत. त्यातील सगळ्यात चर्चेत आलेली योजना म्हणजे लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana). अगदी प्रचार सभांमधील भाषणांमधूनही सरकारकडून या योजनेचा प्रसार करण्यात येतोय. त्यातच अनेक कलाकार मंडळीही या योजनेच्या जाहिराती करताना पाहायला मिळतायत. अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिनेही तिच्या सोशल मीडियावरुन लाडकी बहिण योजनेची जाहिरात केली आहे. पण तिला या जाहिरातीमुळे बरंच ट्रोल केलं जातंय. 


लाडकी बहिण योजनेअंतर्गत सरकार महाराष्ट्रातल्या महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देत आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी या योजनेचा शुभारंभ सरकारकडून करण्यात आला. त्यानंतर अनेक महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले आहेत. महायुती सरकारच्या याच योजनेविषयी अमृताने तिच्या या व्हिडीओमध्ये भाष्य केलं आहे. पण तिने केलेल्या जाहिरातीवरुन तिला बरंच ट्रोल करण्यात आलंय. 


अमृताची जाहिरात नेमकी काय?


अमृताच्या या जाहिरातीमध्ये एक मुलगी तिच्याजवळ येते आणि म्हणते तुमच्या आवडीचं मी काहीतरी घेऊन आले आहेत. तेव्हा ती मुलगी अमृताला लोणचं देते. त्यावर अमृता म्हणते कैरीचं लोणचं याच्याशिवाय मी जेवूच शकत नाही.त्यावर ती मुलगी म्हणते तुम्हाला माहितेय हे लोणचं कुणी बनवलं आहे, माझ्या मैत्रीणीने हे लोणंचं बनवलंय..त्यावर अमृता तिला विचारते की,तुझ्या मैत्रीणीने बनवलंय... ते कसं काय? पुन्हा ती मुलगी म्हणते की, पहिल्यांदा तिच्याकडे काहीच नव्हतं.. मग लाडकी बहिण योजनेच्या मदतीने तिने तिचा लोणच्याच्या व्यवसाय सुरु केला आणि आता हेच लोणचं प्रत्येक घराघरांत जातंय... पुढे अमृता म्हणते की,माझ्या आवडत्या लोणच्यामागे अशी प्रेरणादायी गोष्ट असेल मला माहितीच नव्हतं.खरंच हे सरकार म्हणजे ना लोकांचं आयुष्य बदलून टाकतंय. हे महायुती सरकार खरंच लोकांसाठी खूप छान काम करतंय.त्यांची ही लाडकी बहिण योजना तर महिलांसाठी खूप छान फरक घडवून आणतेय. त्यानंतर अमृता महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन करते. 


अमृता जाहिरातीवरुन ट्रोल


अमृताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या जाहिरातीवरुन तिला बरंच ट्रोल करण्यात येतंय. एका युजरने कमेंट करत म्हटलं की, आंब्याचा सीझन कधी होता आणि लाडकी बहिण योजना कधी आली ?ऑगस्ट मध्ये लागतात का आंबे ? दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हटलं की, या योजनेसारखीच ही जाहिरातही तर्कहीन होती. आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं की, तुमच्याकडून ही अपेक्षा अजिबात नव्हती... एका युजरने कमेंट करत म्हटलं की, तू चांगली काम करतेस.. त्यामुळे स्त्रियांना तू प्रोत्साहन दिलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, कसं कमावलं पाहिजे, कसं तुझ्यासारखं स्ट्रगल करुन पुढे आलं पाहिजे....






ही बातमी वाचा : 


CID in Marathi : 'दया दरवाजा तोडून टाक...', सीआयडीची टीम आता 'मराठी'त गुन्ह्यांचा शोध लावणार