Panchayat 3 Watch For Free: 'पंचायत 3' (Panchayat 3) ही या वर्षातील बहुप्रतिक्षित सिरिजपैकी एक आहे. दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर ही सिरिज अखेर 28 मे रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाली आहे. आता प्राइम व्हिडिओचे सबस्क्रिप्शन असलेले युजर्स 'पंचायत 3' सहज पाहू शकतील. पण ज्यांच्याकडे हे सबस्क्रिप्शन नाही ते देखील ही सिरिज पाहू शकतात आणि तेही विनामूल्य.तुम्ही सबस्क्रिप्शनशिवायही प्राइम व्हिडिओवर 'पंचायत 3' चा आनंद घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त तुमचा ईमेल आयडी वापरावा लागेल. खरंतर प्राइम व्हिडिओ त्यांच्या नवीन युजर्सना फ्री ट्रायल्स देत असतात. हे फ्री ट्रायल्स एक महिन्यासाठी असते. त्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड सिरिज आणि सिनेमांचा आनंद घेऊ शकता.
जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, सान्विका, रघुबीर यादव, चंदन रॉय, फैजल मलिक आणि अशोक पाठक असे अनेक कलाकार या वेब सीरिजमध्ये आहेत. आता फुलेरा गावात यावेळेस काय वेगळे होणार आहे हे जाणून घेण्यासाठीची चाहत्यांची उत्सुकता आत संपली आहे. पण ही सिरिज जर तुम्हाला फ्रीमध्ये पाहायची असेल तर त्यासाठी या गोष्टी फॉलो करा.
'पंचायत 3' पहा मोफत
प्राइम व्हिडिओवरील फ्री ट्रायल युज करण्यसाठी आणि त्यामध्ये तुमच्याकडे 'पंचायत 3' पाहण्यासाठी क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे. तुमच्या क्रेडीट कार्डचे डिटेल्स भरुन तुम्ही फ्री ट्रायल ऑफर रिव्हिल करु शकता. पण तुम्हाला Amazon.com कॉर्पोरेट लाइन ऑफ क्रेडिट, चेकिंग खाते किंवा प्री-पेड क्रेडिट कार्डद्वारे फ्री ट्रायल युज करता येणर नाही. त्याचप्रमाणे तुम्ही आधीच प्राइम व्हिडिओचे मेंबर असला तरीही तुम्हाला फ्री ट्रायल युज करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला नवीन इमेल आयडी वापरावा लागेल. पण फ्री ट्रायल संपल्यावर मात्र तुम्हाला प्राइम व्हिडिओसाठी पैसे भरावे लागतील.
'पंचायत 3' ची क्रेझ लॉकडाऊनपासून सुरू झाली. या वेब सिरीजचा पहिला सीझन एप्रिल 2020 मध्ये आला होता, ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. दोन वर्षांनंतर, मे 2022 मध्ये 'पंचायत 2' रिलीज झाला आणि तोही हिट ठरला. आता 'पंचायत 3' आली आहे आणि ट्रेंडमध्ये आहे. त्याचप्रमाणे निर्मात्यांनी केलेल्या भाष्यानुसार, या सरिजचे आणखी दोन सीझनही रिलीज होतील. दरम्यान निर्मात्यांच्या या घोषणेने चाहत्यांना आनंद झाला आहे.