Smriti Mandhana Palash Muchhal: स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांच्या लग्नाचा अगदी मुहूर्त ठरलेला, जय्यत तयारी झालेली, हळद लागली, संगीत सोहळाही थाटामाटात पार पडला. पण, अचानक लग्नसोहळा रद्द केल्याच्या बातम्या समोर आल्या. पहिलं कारण समोर आलं स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडल्याचं. तिच्या वडिलांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता स्मृतीच्या वडिलांची तब्येत बरी असून तिच्या वडिलांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पण, त्यानंतरच अचानक एक घटना घडली, ती म्हणजे, स्मृती मानधना आणि तिच्या लग्नसोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या टीम इंडियाच्या सदस्यांनी स्मृती आणि पलाशच्या  साखरपुड्याचे, प्री-वेडींगचे सर्व सोहळ्यांचे फोटो डिलीट केले. बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि प्रकरणाला वेगळंच वळण लाभलं. 

Continues below advertisement

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न रद्द करण्याचं कारण स्मृतीच्या वडिलांची बिघडलेली तब्येत सांगितलं जात होतं. पण, त्यानंतर अचानक सोशल मीडियावर पलाश मुच्छलच्या चॅट्सचे काही स्क्रिनशॉर्ट्स व्हायरल झाले. या स्क्रिनशॉर्ट्सवरुन पलाश स्मृतीला चिट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागल्याचं समोर आलं.

पलाशचं कोरिओग्राफरसोबत अफेअर? (Palash Affair With Choreographer?)

पलाशचं कोरिओग्राफर मेरी डि’कोस्टा नावाच्या मुलीसोबत अफेअर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. दोघांच्या चॅट्सचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दोघांच्या चॅट्सचे स्क्रिनशॉर्ट्सही व्हायरल झालेत. पण, हे स्क्रिनशॉर्ट्स व्हायरल झाल्यापासून पलाशच्या इतर अफेअर्सबाबतही सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. 

Continues below advertisement

पलाश मुच्छल स्मृती मानधनाला चिट करत होता? (Smriti Mandhana And Palash Muchhal Wedding) 

पलाश मुच्छलच्या चॅटचे स्क्रिनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या आधीच्या डेटिंगच्या अफवा आणि रिलेशनशिप्सबाबतही चर्चांना उधाण आलं आहे. स्मृतीसोबतच्या रिलेशनशिपच्या आधी आणि नंतरही पलाशचं नाव अनेक मुलींसोबत जोडलं गेल्याचं सांगितलं जात आहे. एवढंच काय तर, त्यानं त्या मुलींनाही सेम टू सेम स्मृतीसारखंच गुडघ्यावर बसून अंगठी देऊन प्रपोज केल्याचं बोललं जात आहे. पलाशनं आतापर्यंत किती मुलींना डेट केलंय? याचा कच्चाचिठ्ठाच नेटकऱ्यांनी बाहेर काढलाय. हे सर्व पाहून अनेकांना धक्का बसलाय. तसेच, आता या सर्व प्रकरणाबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. अनेकांनी पलाशची बाजू घेतलीय, तर अनेकांनी स्मृती मानधनाला सहानुभूती देऊन पलाशपासून दूर राहण्याचाच सल्ला दिला आहे. 

पलाश मुच्छलची 'प्लेबॉय इमेज', सोशल मीडियावर दावा

एकंदरीत पलाश मु्च्छलची प्लेबॉय इमेज असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातोय. त्यानं आतापर्यंत किती मुलींना डेट केलंय? यापूर्वी कोणासोबत त्याचं रिलेशन होतं? या सर्व बाबी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

पलाशनं आतापर्यंत कुणाकुणाला केलंय डेट? (Palash Cheated Smriti?)

काही वर्षांपूर्वी म्युझिक कंपोजर पलाश मु्च्छल बिरवा शाहला डेट करत होता. स्मृतीसोबत चिट केल्याच्या अफवा पसरताच, पलाश आणि बिरवा शाह यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनाही आता उधाण आलंय. पलाश मुच्छलनं तिला प्रपोज केल्याचे काही फोटो समोर आले आहेत. पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना यांच्या लग्नावरुन सुरू असलेल्या वादात, बिरवा शाहचं नाव सर्वाधिक चर्चेत आलं आहे. परिणामी, बिरवा शाह कोण? हा प्रश्न सर्वाना पडला आहे. बिरवा शाह मुंबईत मेडिकल स्टुडंट होती आणि 2017 मध्ये पलाशनं तिला फिल्मी अंदाजात प्रपोज केलं, तेव्हा ती पहिल्यांदाच प्रसिद्धी झोतात आलेली. पण त्यांचं नातं पुढे जाऊन फार काळ टिकलं नाही आणि दोघेही वेगळे झाले. तसेच, पलाशच्या घरी देखील त्यांच्या या नात्याबद्दल माहीत असल्याचं बोललं जातंय.

व्हायरल झालेल्या ट्विटमध्ये, पलाश गुडघे टेकून बिरवा शाहला अंगठी घालताना दिसत आहे, त्याच्याभोवती फुगे, गुलाबाच्या पाकळ्या आणि मेणबत्त्या आहेत. पलाश आणि बिरवा शाहचे हे फोटो आता इंटरनेटवर सध्या वेगानं व्हायरल होत आहेत.

मेरी डि'कोस्टा (Mary D'Costa)

स्मृतीसोबत रिलेशनमध्ये असताना पलाश मेरी डि'कोस्टा नावाच्या मुलीसोबत फ्लर्ट करत होता, असं म्हटलं जातं. ती एक कोरिओग्राफर असून तिच्यासोबतच्या चॅट्सचे स्क्रिनशॉट्स सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. त्यामुळे तो एकाचवेळी पलाश मेरी आणि स्मृती दोघींनाही फसवत असल्याचा दाव केला जात आहे. 

स्मृती मानधना (Smriti Mandhana)

पलाशनं लग्नासाठी प्रपोज केलेली तिसरी मुलगी म्हणजे, भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना. पलाश आणि स्मृती गेल्या 5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर त्यानं स्मृतीला त्याच स्टेडियममध्ये फिल्मी स्टाइलनं प्रपोजही केलेलं. या कपलनं इंस्टाग्रामवर दोघांचे बरेच फोटो शेअर केले होते. स्मृती आणि पलाश 23 तारखेला एकमेकांशी लग्नही करणार होते. पण, स्मृतीच्या वडिलांची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे लग्न रद्द करण्यात आलं.

दरम्यान, स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न रद्द करण्यात आलं आहे. त्यानंतर दोघांचं लग्न मोडल्याच्या चर्चांना उधाण आलंय. तसेच, पलाश स्मृतीला चिट करत असल्याचंही बोललं जातंय. पलाश मुच्छलनं फसवणूक केल्याच्या चर्चांना स्मृती किंवा तिच्या घरच्यांपैकी कोणीही दुजोरा दिला नसला तरी, त्यांच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का आहे.