Horoscope Today 26 November 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 26 नोव्हेंबर 2025, आजचा वार बुधवार आहे. मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. आज चंपाषष्ठी तसेच नोव्हेंबर महिन्याचा (November 2025) शेवटचा बुधवार असल्याने हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या (Astrology) दृष्टीने खास आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. खंडेरायाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज आज कष्टदायी दिवस असला तरी शांतपणाने काम कराल, स्थावर इस्टेटच्या कामांमध्ये थोड्याफार अडचणी येतील 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज घरातील तरुण वर्गाला मोठ्या माणसांची सल्ले पटणार नाहीत, त्यामुळे घरामध्ये थोडे तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज थोडा तापटपणा वाढेल, भागाची साथ थोडी कमी मिळाली तरी चिकाटीने आपली कामे पूर्ण कराल 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज दिवस थोडा मानसिक त्रासाला कारणीभूत ठरेल ओंकार आणि उपासना मार्गाचा जास्तीत जास्त अवलंब केल्यास मनशांती लाभेल. 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज महिलांनी आपल्यातली कला ओळखून त्याप्रमाणे पुढील वाटचाल करावी, कोणाला वेळ दिलेली असेल तर ती पाळावी 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज व्यवसायात बरेच दिवसांपासून अडून राहिलेल्या ऑर्डर्स पूर्ण कराल, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या नजरेत भरणारी गोष्ट हातून घडेल 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज सरकारी नोकरीमध्ये आपली कामाची तडफ दाखवल्यामुळे नवीन जबाबदाऱ्या अंगावर टाकतील 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज घरामध्ये मनस्वास्थ्य सांभाळण्यासाठी जवळच्या लोकांची मदत घ्यावी लागेल, इन्शुरन्स क्षेत्रात काम करणाऱ्यांना उत्साह येईल 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज आर्थिक टंचाई तात्पुरती दूर होईल, छोट्या प्रवासाचे योग येतील

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज घरात आणि घराबाहेर डोके शांत ठेवावे लागेल, महिलांची मानसिक आंदोलने वाढतील 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज परिस्थितीचा उत्तम आढावा घ्याल, स्वतःची मर्यादा ओळखून परिपूर्ण काम कराल,

हेही वाचा

December 2025 Astrology: अवघे 5 दिवस शिल्लक 3 राशींचं नशीब पालटायला! डिसेंबरमध्ये तब्बल 4 ग्रहांचा चतुर्ग्रही योग बनतोय, पैसा, नोकरी, प्रेमात मोठं सुख..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे कुटुंबामध्ये आनंदी वातावरण राहील