Pakistani reaction to Dhurandhar The Revenge movie: धुरंधर 2 चित्रपटाची क्रेझ केवळ भारतात नसून, सातासमुद्रापार पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने अवघ्या 4 दिवसांत 500 कोटींचा वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिस  कलेक्शन केला आहे. धुरंधरच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांमध्ये उस्तुकता निर्माण केली होती. दुसऱ्या पार्टमध्ये नेमकं काय होणार? हे जाणून घेण्यास प्रेक्षक आतुर होते. दरम्यान, आता प्रतिक्षा संपली. 19 मार्चला धुरंधर चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रदर्शित झाला.  हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड्स मोडत आहे. धुरंधर 2 सध्या भारतासह अमेरिका, कॅनेडा आणि युकेसह  इतर अनेक ठिकाणी धुमाकूळ घालत आहे. भारतीय प्रेक्षकांसोबतच, पाकिस्तानातील जनताही आवर्जून  हा चित्रपट पाहत आहेत. 

Continues below advertisement

धुरंधरच्या पहिल्या भागावर पाकिस्तान तसेच  संपूर्ण मध्य पूर्वेत बंदी घालण्यात आली होती.  दरम्यान, दुसरा भागही या देशांमध्ये दाखवला जात नाहीये.  परंतु, तरीही पाकिस्तानमधील जनता जे इतर देशात स्थायिक आहेत, ते थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहत आहेत.   पहिला भाग पाहिल्यानंतर पाकिस्तानच्या नागरिकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. आदित्य धरचा हा चित्रपट चांगला असून, यातून सत्य दाखवण्यात आलं आहे, असं पाकिस्तानी नागरिक म्हणाले होते.   

पण आता दुसरा भाग धुरंधर: द रिव्हेंज पाहून पाकिस्तानी नागरिकांना धक्का बसला. त्यांना हा चित्रपट आवडला नाही. धुरंधर 2 पाहण्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत गेलेल्या एका पाकिस्तानी युझरचा व्हिडिओ एक्सवर व्हायरल होत आहे.  हा चित्रपट पाहून पाकिस्तानी तरुणीनं चित्रपटाचं कौतुक नसून,  फक्त टीका केली आहे.  पाकिस्तानी युझरच्या फॅमिलीनं धुरंधर: द रिव्हेंज हा चित्रपट बकवास, थर्ड क्लास म्हटलं आहे. धुरंधरचा पहिला भाग जबरदस्त होता, पण  दुसरा पार्ट हा थर्ड क्लास होता, असं तिनं आपल्या व्हिडिओत म्हटलं आहे.  व्हिडिओच्या शेवटी, प्रत्येकजण पाकिस्तान जिंदाबादच्या  घोषणा देतात. 

Continues below advertisement

 

पाकिस्तानी नागरिकांनी धुरंधर 2वर दिलेल्या रिव्ह्यूनंतर, भारतीयांनी त्यांची चांगलीच शाळा घेतली.  एका नेटकऱ्याने व्हिडिओच्या कमेंटमध्ये, 'लोकांना खरं पचत नाही, त्यामुळे हा चित्रपट त्या लोकांना आवडला नसेल', असं म्हटलं आहे.  तर, आणखी एका युझरने, 'पाकिस्तानी लोक स्वत:चाच अपमान पाहण्यासाठी स्वत:चेच पैसे खर्च करत आहेत', असं म्हटले आहे.