Ashok Kharat: नाशिकमध्ये (Nashik) गाजत असलेले अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरण आता नव्या आणि वेगळ्या वळणावर पोहोचले आहे. एकीकडे विशेष तपास पथकाकडून (SIT) खरात आणि त्याच्या संबंधितांची कसून चौकशी सुरू असताना, दुसरीकडे या प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे आधीच खळबळ उडालेल्या या प्रकरणात आता राजकारणही चांगलेच तापले आहे.

Continues below advertisement

या पार्श्वभूमीवर, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी देसाई यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचा आणि ‘तडजोडीचा’ खळबळजनक आरोप केला आहे. त्यामुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Rupali Patil on Trupti Desai: तृप्ती देसाईंची रुपाली चाकणकरांशी तडजोड

रूपाली पाटील यांच्या आरोपानुसार, अशोक खरात प्रकरणातील आक्षेपार्ह व्हिडिओ तृप्ती देसाई यांच्या ताब्यात आधीपासूनच होते. मात्र, हे व्हिडिओ सार्वजनिक करण्याऐवजी देसाई यांनी खरात यांच्या पत्नी आणि राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी तडजोड केल्याचा दावा त्यांनी केला आहे. या तडजोडीत कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा गंभीर आरोपही पाटील यांनी केला आहे. यामागे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

Continues below advertisement

Rupali Patil on Trupti Desai: त्यांनीच या प्रकरणात तडजोड कशी केली? 

तर रूपाली पाटील यांनी “ज्या तृप्ती देसाई महिलांच्या हक्कासाठी लढण्याचा दावा करतात, त्यांनीच या प्रकरणात तडजोड कशी केली? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, SIT कडून तृप्ती देसाई यांचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून सुरू झालेले हे प्रकरण आता दोन महिला नेत्यांमधील थेट आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे सामाजिक आणि राजकीय वातावरण अधिकच तापले असून, आता या आरोपावर तृप्ती देसाई काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

Ashok Kharat Case: नेमकं प्रकरण काय?

अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गंभीर गुन्हा नोंदविण्यात आला असून, नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 35 वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली खरातवर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार, 18 मार्च रोजी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

दरम्यान, पोलिसांनी कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयाची झडती घेतली असता एक पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला. सुरुवातीला या पेन ड्राइव्हमध्ये 58 व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली होती. मात्र, पुढील तपासात ही संख्या वाढून सुमारे 100 व्हिडिओ असल्याचे उघड झाले आहे. आता अशोक खरातच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आणखी 3 महिला पुढे आल्या आहेत. त्यामुळे खरात विरोधात कारवाई करण्यासाठी एसआयटीला आणखी सबळ पुरावे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर अशोक खरात याच्या सोबतचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय.  

आणखी वाचा 

Devendra Fadnavis on Ashok Kharat: अशोक खरात प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विरोधकांना म्हणाले, 'कोण कोण जायचं त्याचे पुरावे...'