OTT Webseries: ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक सुंदर प्रेमकथेवर आधारित वेब सीरिज प्रदर्शित झालीय. अवघ्या 24 तासांतच तिने प्रेक्षकांची मनं जिंकण्यास सुरुवात केली असून रिलीज होताच ही सीरिज ओटीटीवर ट्रेंडिंगच्या स्पर्धेत टॉपला आहे. विशेष म्हणजे ही रोमँटिक सीरिज एका बेस्टसेलर कादंबरीवर आधारित आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या या कादंबरीने वाचकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. प्रेमाच्या त्रिकोणी नात्यावर आधारित ही कथा आता वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली आहे.

Continues below advertisement

विक्रांत मेस्सीची नवी सीरिज

या सीरिजचे नाव 'मुसाफिर कॅफे' असून ती लेखक दिव्य प्रकाश दुबे यांच्या याच नावाच्या गाजलेल्या कादंबरीवर आधारित आहे. या सीरिजमध्ये विक्रांत मेस्सी, वेदिका पिंटो आणि महिमा मकवाना प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.या सीरिजची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. कादंबरी वाचून मनात उभी राहिलेली पात्रे आणि कथा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. अखेर 24 जुलै रोजी ही सीरिज ओटीटीवर प्रदर्शित झाली.

ओटीटीवर नंबर-1 ट्रेंडिंग

प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या 24 तासांतच 'मुसाफिर कॅफे'ने मोठी लोकप्रियता मिळवली आहे. ही 8 भागांची सीरिज सध्या नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत असून तिने 'लॉक अप सीझन 2'सह इतर सर्व ट्रेंडिंग सीरिजना मागे टाकले आहे. सध्या नेटफ्लिक्सवर ही सीरिज नंबर- 1 ट्रेंडिंग स्थानावर आहे.

Continues below advertisement

काय आहे 'मुसाफिर कॅफे'ची कथा?

'मुसाफिर कॅफे' ही एक रोमँटिक ड्रामा सीरिज आहे. तिची कथा चंदर (विक्रांत मेस्सी) या तरुणाभोवती फिरते. चंदरचं आधी सुधा (वेदिका पिंटो)वर प्रेम जडतं. मात्र काही कारणांमुळे त्यांचं नातं तुटतं. त्यानंतर त्याच्या आयुष्यात प्रीती (महिमा मकवाना) येते आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात.मात्र, प्रीतीच्या मनात कायम एक भीती असते,जर सुधा पुन्हा चंदरच्या आयुष्यात परत आली, तर काय होईल? आणि एक दिवस सुधा खरंच चंदरसमोर येते. त्यानंतर या तिघांच्या आयुष्यात कोणते भावनिक वळण येते, हेच या सीरिजचे मुख्य आकर्षण आहे.