OTT Releases This Week: सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सची चलती आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. डिजिटलच्या युगात प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन चित्रपटांचा आनंद घेणं पसंत करतात. ओटीटीमुळे प्रेक्षकांच्या हातात एन्टरटेन्मेंट आलं आहे. तुम्ही कधीही, कुठेही हवा तो चित्रपट, वेब सीरिज पाहू शकता. दररोज म्हटलं तरी नवनव्या वेब सीरिज आणि चित्रपट ओटीटीवर येत असतात. अशातच या आठवड्यातही ओटीटीवर अनेक धमाकेदार चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत.
नव्या आठवड्यात ओटीटीवर काय नवीन येणार? पाहुयात सविस्तर...
खाकी: द बंगाल चॅप्टर (Khakee: The Bengal Chapter)
'खाकी: द बिहार चॅप्टर' नंतर, निर्माते आता या वेब सीरिजचा दुसरा भाग 'खाकी: द बंगाल चॅप्टर' घेऊन येत आहेत. खाकीच्या पहिल्या पार्टला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. अशातच आता दुसरा पार्टही ओटीटी गाजवणार यात काही शंका नाही. येत्या 20 मार्च रोजी 'खाकी: द बंगाल चॅप्टर' रिलीज होणार आहे. तुम्ही नेटफ्लिक्सवर ही वेब सीरिज पाहू शकतात.
अनोरा (Anora)
'अनोरा' हा हॉलिवूड चित्रपट (Hollywood Movie) 18 ऑक्टोबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. 2025 च्या ऑस्करमध्ये सर्वाधिक पुरस्कार जिंकणाऱ्या चित्रपटाचा किताब 'अनोरा' ला मिळाल्यानं प्रेक्षक आतुरतेनं चित्रपटाची वाट पाहत आहेत. 5 ऑस्कर अवॉर्ड्सवर मोहोर उमटवणारा हा चित्रपट ओटीटीवर येणार आहे. हा चित्रपट 17 मार्च रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
कन्नैड (Kannada)
'कन्नैड' ही वेब सिरीज 1990 मधलं चित्रण पडद्यावर दाखवणारी वेब सीरिज आहे. या वेब सीरिजमध्ये 1984च्या शीख दंगलीनंतर कॅनडाला जाऊन गुंड बनणाऱ्या पंजाबी तरुणांची कहाणी दाखवण्यात आली आहे. तो त्याच्या गाण्यांद्वारे वंशवाद आणि इतर अडचणींचा सामना करतो. पण नंतर तो कोणत्यातरी गँगचा भाग बनतो. ही वेब सिरीज 21 मार्च रोजी जिओ हॉटस्टारवर प्रसारित होईल.
ऑफिसर ऑन ड्यूटी (Officer On Duty)
दिग्दर्शक जीतू जोसेफ यांचा 'ऑफिसर ऑन ड्यूटी' हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा मल्याळम अॅक्शन आणि सस्पेन्स थ्रिलर चित्रपट 20 मार्च रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
मिस्ट्री: द रेसिडेंस (Misty The Resident)
हॉलिवूडची डॉक्यूमेंट्री सीरीज 'मिस्ट्री: द रेसिडेंस' हा एक पॉलिटिकल ड्रामा आहे, जो लोकप्रिय लेखिका केट अँडरसन ब्रॉवर यांच्या पुस्तकावर आधारित आहे. ही डॉक्यूमेंट्री सीरिज 20 मार्च रोजी नेटफ्लिक्सवरही प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :