OTT Release This Week : सध्याच्या काळात मनोरंजनासाठी प्रेक्षकांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. थिएटर आणि छोट्या पडद्यासह ओटीटीचा पर्याय प्रेक्षकांना उपलब्ध होणार आहे. ओटीटीवर ऑगस्टच्या या आठवड्यातही (5 ते 11 ऑगस्ट)  अॅक्शन, रोमँटिक, कॉमेडी अशा वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट, वेब सीरिज रिलीज होणार (OTT Release This Week)  आहे. 



फिर आयी हसीन दिलरुबा 


2021 मध्ये रिलीज झालेल्या 'हसीन दिलरुबा' या रोमँटिक थ्रिलर चित्रपटाचा सिक्वेल 'फिर आयी हसीन दिलरुबा' रिलीज होणार आहे. आधीच्या चित्रपटाची कथा जिथून संपली तिथून या चित्रपटाची कथा सुरू होणार आहे. चित्रपटात तापसी पन्नू, विक्रांत मॅसी आणि सनी कौशल दिसणार आहेत.  हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.


टर्बो


सुपरस्टार मामुटी यांचा चित्रपट 'टर्बो' ओटीटीवर रिलीज होणार आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जवळपास 71 कोटींची कमाई केली. हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी 'सोनी लिव्ह'वर रिलीज होणार आहे. 


चंदू चॅम्पियन 


कार्तिक आर्यन याने दमदार भूमिका साकारलेला चंदू चॅम्पियन हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर पाहता येणार आहे. हा चित्रपट  प्राईम व्हिडीओवर ओटीटीवर रेंटवर पाहता येत होता. आता,'चंदू चॅम्पियन' ओटीटीवर सगळ्यांसाठी उपलब्ध झाला आहे. 9 ऑगस्टपासून हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर रेंटशिवाय उपलब्ध झाला आहे. 


लाइफ हिल गई


'मिर्झापूर' या वेब सीरिजमध्ये मुन्ना भैयाची भूमिका साकारणारा अभिनेता दिव्येंदू आता कॉमेडी-ड्रामा वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. 'लाइफ हिल गई' ही   वेब सीरिज 9 ऑगस्ट रोजी OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर (Disney + Hotstar) प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजमध्ये दिव्येंदू सोबत कुशा कपिला आणि कबीर बेदी झळकणार आहेत.


ग्यारह ग्यारह


'ग्यारह ग्यारह' ही एक फिक्शनल थ्रिलर वेब सीरिज आहे. या वेब सीरिजचे कथानक 1990, 2001 आणि 2016 या कालावधीतील आहे. या वेब सीरिजमध्ये स राघव जुयाल, धैर्य करवा यांच्यासोबत कृतिका कामराचीदेखील भूमिका आहे. ही वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म Zee5 वर 9 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. 



द इन्स्टिगेटर्स (The Instigators)


'द इन्स्टिगेटर्स' चे कथानक एका अयशस्वी दरोड्याच्या भोवती फिरते. दरोड्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर दोन चोरांना पळ काढण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नसतो. अटकेची कारवाई टाळण्यासाठी आपल्या प्लानमध्ये ते एका डॉक्टराचाही समावेश करतात. अॅपल टीव्हीवर तुम्हाला पाहता येईल. 


मिशन क्रॉस  (Mission Cross)


'मिशन क्ऱॉस' ची कथा  एका मिशनवर बेतलेली आहे. कधीकाळी एजंट असलेला तरुण आपला भूतकाळ मागे ठेवून आपल्या पत्नीसोबत गृहिणी म्हणून राहत आहे. पण, एका घटनेमुळे तो आपल्या होणाऱ्या पत्नीसह एका धोकादायक मिशनमध्ये अडकतो. तिला त्याच्या भूतकाळाबाबत फारशी माहिती नसते. या दोघांच्या आयुष्यात काय घडतं, कोणत्या संकटांना सामोरे जावे लागेल हे चित्रपटात पाहता येईल. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येईल. 


घुडचढी


पार्थ समथान, खुशाली कुमारी, संजय दत्त आणि रवीना टंडन यांचा रोमँटिक कॉमेडी 'घुडचढी' चित्रपट आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन बिनॉय गांधी यांनी केले आहे.


इंडियन 2 (Indian 2)


1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इंडियन' या चित्रपटाचा सिक्वेल इंडियन 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला. कमल हासन यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज होणार आहे.