OTT Release This Week: या आठवड्याचा वीकेंड मनोरंजनाने पुरेपूर भरलेला असणार आहे. OTT प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक दमदार चित्रपट आणि सिरीज रिलीज झाले असून बिंज वॉचिंगसाठी जबरदस्त ऑप्शन तयार झाले आहेत. अॅक्शन, थ्रिलर, हॉरर, फॅमिली ड्रामा ते म्युझिक डॉक्युमेंट्रीपर्यंत सगळ्या प्रकारचा कंटेंट यावेळी प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे. या शुक्रवारी (27 मार्च 2026) OTT प्लॅटफॉर्मवर नव्या चित्रपट आणि सिरीजचा मोठा धडाका पाहायला मिळतोय. BTS ची डॉक्युमेंट्री असो किंवा राणी मुखर्जीची ‘मर्दानी 3’, प्रेक्षकांसाठी विविध जॉनरमधील मनोरंजन उपलब्ध आहे. पाहूया या आठवड्यात OTT वर काय नवीन आलंय. (OTT release)
‘ओ’रोमियो’
विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘ओ’रोमियो’ ही फिल्म 1990 च्या दशकातील मुंबईवर आधारित आहे. अफशा म्हणजेच तृप्ती डिमरी) आपल्या पतीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गँगस्टर हुसैन उस्ताराला म्हणजेच (शाहिद कपूर) डॉन जलालला मारण्यासाठी सुपारी देते. ही फिल्म अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर 27 मार्चपासून रेंटवर उपलब्ध आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ती फ्रीमध्ये पाहता येईल.
‘मर्दानी 3’
‘मर्दानी 3’ हा यश राज फिल्म्सचा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. अभिराज मीनावाला दिग्दर्शित या चित्रपटात राणी मुखर्जी एसएसपी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत दिसते. 93 मुली बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या तपासात मोठं ह्यूमन ट्रॅफिकिंग रॅकेट उघड होतं. हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर 27 मार्चपासून स्ट्रीम होत आहे.
‘काट्टान’
‘काट्टान’ ही तमिळ अॅक्शन-ड्रामा सिरीज आहे. एका डोंगरावर सापडलेल्या छाटलेल्या डोक्यापासून ही कथा सुरू होते आणि पुढे सस्पेन्सने भरलेली थरारक गोष्ट उलगडते. विजय सेतुपती मुख्य भूमिकेत असलेली ही सिरीज जिओहॉटस्टारवर 27 मार्चपासून उपलब्ध आहे.
‘प्रोजापती 2’
अविजित सेन दिग्दर्शित ‘प्रोजापती 2’ हा बंगाली फॅमिली ड्रामा आहे. मिथुन चक्रवर्ती आणि देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बाप-लेकाच्या नात्यावर आधारित ही भावनिक कथा झी5 वर 27 मार्चपासून रिलीज झाली आहे.
‘समथिंग वेरी बॅड इज गोइंग टू हॅपन’
ही 2026 मधील सुपरनॅचरल हॉरर मिनीसीरीज आहे. हेली झेड. बॉस्टन यांनी ती तयार केली असून डफर ब्रदर्स यांनी प्रोड्यूस केली आहे. एका जोडप्याच्या आयुष्यातील शांत क्षण कसे भयावह अनुभवात बदलतात, याची ही थरारक कथा आहे. ही सिरीज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
‘बीटीएस द रिटर्न’
बाओ गुयेन दिग्दर्शित ‘बीटीएस द रिटर्न’ ही डॉक्युमेंट्री BTS च्या कमबॅकवर आधारित आहे. मिलिटरी सर्व्हिसनंतर पुन्हा एकत्र येत त्यांनी तयार केलेल्या ‘अरिरंग’ अल्बमची ही कहाणी आहे. ही डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्सवर 27 मार्चपासून स्ट्रीम होत आहे.
‘फाती ने?’
फैसल हाशमी दिग्दर्शित ‘फाती ने?’ ही गुजराती हॉरर-कॉमेडी फिल्म आहे. दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या भुताटकी हवेलीत घडणाऱ्या घटनांवर आधारित ही कथा आहे. हा चित्रपट शेमारूमीवर 27 मार्चपासून पाहता येतो.एकंदरीत, या वीकेंडला OTT वर विविध जॉनरमधील दमदार कंटेंट उपलब्ध आहे. त्यामुळे घरबसल्या एंटरटेनमेंटचा फुल डोस घ्यायला तयार रहा!
