OTT kajol ronit roy maa Movie : साल 2025 मधील म्हणजेच या वर्षी प्रदर्शित झालेला एक हॉरर सिनेमा ओटीटीवर उपलब्ध झालाय. या सिनेमाची स्टोरी अत्यंत भयानक आहे. तब्बल 133 मिनिटे ही फिल्म तुम्हाला डोळे मिचकावायलाही वेळ देत नाही. एकदा पाहायला सुरुवात केली की थेट क्लायमॅक्सपर्यंत नजर खिळून राहते. ज्या चित्रपटाबद्दल आपण बोलत आहोत त्याचं नाव आहे ‘माँ’.

Continues below advertisement


काजोलची ही सुपरनॅचरल हॉरर फिल्म ओटीटीवर दाखल झाली आहे. यात अभिनेत्रीने अंबिका नावाची भूमिका साकारली आहे. कथेत दाखवले आहे की, अंबिका पतीच्या मृत्यूनंतर आपल्या टीनएज मुलीसोबत शहरात राहत असते.


काही कारणांमुळे अंबिका आपल्या मुलीसोबत आपलं वडिलोपार्जित घर विकण्यासाठी त्या डोंगराळ छोट्या गावात जाते, जिथे ती जन्मली व वाढली होती. पण तिथे पोहोचताच खरी भीतीची सुरुवात होते. गावकरी सांगतात की अनेक वर्षांपासून तिथे तरुण मुली गायब होतात किंवा मारल्या जातात.


गावकऱ्यांचा विश्वास असतो की या घटनांमागे एक दुष्ट शक्ती आहे. अंबिकाची मुलगी मात्र अलौकिक शक्ती जाणवण्याची क्षमता बाळगते. तिला एका विचित्र आजाराने ग्रासलेले असते, आणि त्यावरचा इलाजच त्या दुष्ट शक्तीला तिच्याजवळ खेचतो. लवकरच ती शक्ती अंबिकाच्या मुलीलाही लक्ष्य करते.


मुलगी धोक्यात आहे हे लक्षात येताच अंबिका तिला वाचवण्यासाठी झगडते. एक चित्रकार म्हणून अंबिकाला आपल्या वडिलोपार्जित घरात जुनी पुस्तके व नकाशे सापडतात, ज्यातून कळते की तिच्या पूर्वजांनी कधीकाळी या दुष्ट शक्तीला काबूत ठेवले होते.


पूर्वजांनी त्या शक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एका खास विधी किंवा कलाप्रकाराचा वापर केला होता. अंबिका हे रहस्य उलगडून मुलगी आणि गावकऱ्यांना वाचवण्यासाठी त्या दुष्ट शक्तीशी कठोर लढा सुरू करते. या चित्रपटाच्या प्रत्येक सीन भीतीदायक वाटतो. 


काजोलची सुपरनॅचरल हॉरर फिल्म ‘माँ’ 22 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. सध्या ती भारतातील टॉप 10 लिस्टमधील चौथ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे, तर पहिल्या स्थानावर विजय देवरकोंडाची अॅक्शन थ्रिलर फिल्म ‘किंगडम’ आहे.


या चित्रपटाचं दिग्दर्शन विशाल फुरिया यांनी केलं असून निर्माते आहेत अजय देवगण. ‘माँ’ मध्ये काजोलसोबत रोनित रॉय, गोपाल सिंह, इंद्रनील सेनगुप्ता आणि दिव्येंदु भट्टाचार्य असे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसतात. फक्त 133 मिनिटांची ही मूव्ही तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.


 


 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांचा फोटो शेअर करत रितेश देशमुखची पोस्ट, म्हणाला..