Oscar Nominations 2023 List : ऑस्कर (Oscar) हा पुरस्कार मनोरंजनक्षेत्रातील मनाचा पुरस्कार मानला जातो. ऑस्कर-2023 ची शॉर्टलिस्ट यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली. आता ऑस्कर-2023 ची नामांकन यादी (Oscar Nominations 2023) जाहीर केली जाणार आहे. आज (24 जानेवारी) ऑस्कर नॉमिनेशन लिस्टची घोषणा कॅलिफोर्नियामधील बेव्हरली हिल्स थिएटरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात केली जाणार आहे. ऑस्कर विजेते अभिनेता-निर्माते रिझ अहमद आणि अॅलिसन विल्यम्स हे हा कार्यक्रम होस्ट करणार आहेत. 

कुठे आणि कधी पाहता येणार सोहळा?

ऑस्कर डॉट कॉम, ऑस्कर डॉट ओआरजी तसेच अॅकॅडमी  डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ऑस्कर नॉमिनेशन सोहळा पाहता येईल. भारतातील प्रेक्षकांना हा सोहळा संध्याकाळी सात वाजता पाहता येणार आहे.

ऑस्कर- 2023 साठी भारताकडून 'आरआरआर' आणि 'छेल्लो शो' हे चित्रपट भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात आले आहे. नामांकन यादीमध्ये या चित्रपटांचा समावेश होईल का? या प्रश्नांचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल. 

या कॅटेगिरीमधील नामांकन यादी होणार जाहीर 

सहाय्यक भूमिका (अभिनेता)सहाय्यक भूमिका (अभिनेत्री)अॅनिमेटेड फीचर फिल्मअॅनिमेटेड शॉर्ट फिल्मकॉस्टुम डिझाइनलाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्ममेकअप आणि हेअर स्टायलिंगसंगीत (ओरिजनल स्कोअर)साऊंडलेखन (रूपांतरित पटकथा)लेखन (मूळ पटकथा)प्रमुख भूमिकेत अभिनेताप्रमुख भूमिकेत अभिनेत्रीसिनेमॅटोग्राफीदिग्दर्शनडॉक्युमेंट्री फिचर फिल्म  डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म  फिल्म एडिटिंगआंतरराष्ट्रीय फीचर फिल्मसंगीत (ओरिजनल साँग)सर्वोत्तम पिक्चरप्रोडक्शन डिझाइनव्हिज्युअल इफेक्ट्स

ऑस्कर पुरस्कार सोहळा 12 मार्च रोजी लॉस एंजेलिस येथील ओव्हेशन हॉलिवूड डॉल्बी येथे पार पाडणार आहे. 

आरआरआरहा चित्रपट ऑस्करच्या शॉर्टलिस्टेड चित्रपटाच्या यादीत सामील झाला आहे. 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटातील वीएफएक्स, चित्रपटाचं कथानक आणि चित्रपटातील कलाकारांचा अभिनय या सर्वच गोष्टींना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटामधील नाटू नाटू या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. तर ऑस्करच्या शॉर्टलिस्टेड चित्रपटाच्या यादीत छेल्लो शो चित्रपटाचा देखील समावेश झाला. दिग्दर्शक पान नलिन (Pan Nalin)  यांनी छेल्लो शो चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 24 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!