Oscars 2021 कलाविश्वात अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली असून, एकामागून एक कलाकाविष्कारांचा गौरव या सोहळ्याक झाल्याचं पाहायला मिळालं. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे 93 व्या ऑस्कर सोहळ्यात विविध विभागातील पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदाचा पुरस्कार सोहळा यासाठी खास आहे, कारण त्याचं सूत्रसंचालन कोणाच्याही हाती नसून कोणी प्रेक्षकही या सोहळ्यासाठी उपस्थित नाहीत. 


नेटफ्लिक्सनं यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात चांगलाच दबदबा प्रस्थापित केल्याचं दिसून आलं. तब्बल 36 नामांकनं एकट्या नेटफ्लिक्सकडे होती. यामध्ये डेविड फिन्चरचा ब्लॅक एंड व्हाइट ड्रामा 'मैनक'चाही समावेश आहे.  


सर्वोत्कृष्ट चित्रपटापासून माहितीपटापर्यंतच्या यंदाच्या ऑस्कर विजेत्यांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे 


चित्रपट 
नोमॅडलँड






संगीत (Original Song)
"Fight For You" जूदास अॅण्ड ब्लॅक मसिहा


संगीत (Original Score)
सोल ( ट्रेंट रेंजर, अॅटिकस रॉस, जॉन बतिस्टे) 


चित्रपट संकलन 
साऊंड ऑफ मेटल (मिकेल नेल्सन) 


छायांकन 
मँक (एरिक मेसेर्शमिट) 


प्रोडक्शन डिझाईन 
मँक ( प्रोडक्शन डिझाईन : डोनाल्ड ग्रॅहम बर्ट ; सेट डेकोरेशन : जॅन पास्कल) 


सहाय्यक अभिनेत्री 
Minari (Yuh-Jung Youn)
 
व्हिज्युअल इफेक्ट्स 
टेनेट (अँड्यू जॅकसन, डेव्हिड ली, अँड्यू लॉकली, स्कॉट फिशर) 


माहितीपट (Short Subject)
कोलेट (अँटनी गिआचिनो, अॅलिस डोयार्ड) 


अॅनिमेटेड फिचर फिल्म 
सोल 


लघुपट (Animated)
इफ एनिथिंग हॅपन्स आय लव्ह यू 


लघुपट (Live Action)
टू डिस्टंट स्ट्रेंजर्स 


ध्वनी 
साऊंड ऑफ मेटल ( निकोलस बेकर, जेमी बक्श्त, मायकल कोटोलेंक, कार्लोस कोर्तेस, फिलीप ब्लाध) 


दिग्दर्शन 
नोमॅडलँड (Chloé Zhao)


वेशभूषा 
माय रेनीस ब्लॅक बॉटम (अॅन रोथ)


रंगभूषा आणि केशभूषा 
माय रेनीस ब्लॅक बॉटम (सर्जिओ लोपेज रिवेरा, मिया निल, जेमिका विल्सन) 


सहाय्यक अभिनेता 
जूदास अॅण्ड ब्लॅक मसिहा (डॅनियल कलूया) 


आंतरराष्ट्रीय चित्रपट 
अनदर राऊंड (डेन्मार्क) 


लेखन (Adapted Screenplay)
द फादर (ख्रिस्तोफर हँप्टन, फ्लोरेन झेलर)


लेखन (Original Screenplay)
प्रॉमिसिंग यंग वूमन (एमरल्ड फेनेल)