Oscar Nominations 2023 : ऑस्करचे नामांकन नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. ऑस्करमधील पुरस्कार हे चित्रपटसृष्टीत महत्त्वाचे आणि मोलाचे मानले जातात. या ऑस्कर पुरस्कारांमध्ये शौनक सेनच्या 'ऑल दॅट ब्रेथ्स' (All That Breathes) या चित्रपटाला डॉक्युमेंटरी फीचर फिल्म श्रेणीमध्ये भारतासाठी नामांकन मिळालं आहे. शौनक सेनचा प्रशंसनीय चित्रपट ऑल दॅट ब्रेथ्स, आंतरराष्ट्रीय स्तरावर सह-निर्मित हिंदी शीर्षक, सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर श्रेणीमध्ये पहिल्या पाच श्रेणीत नामांकन मिळालं आहे.


राजधानी दिल्लीतील मोहम्मद सौद आणि नदीम शहजाद या दोन भावंडांची ही कथा आहे. ज्यांनी जखमी पक्ष्यांना, विशेषतः गरुडांना वाचवण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे.






'ऑल दॅट ब्रीद्स'ने पहिले जागतिक सिनेमा ग्रँड ज्युरी पारितोषिक जिंकले. या वर्षीच्या सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या डॉक्युमेंटरीचा प्रीमियर झाला, जो स्वतंत्र सिनेमा आणि चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देणारा आहे आणि या डॉक्युमेंटरीला 2022 कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी गोल्डन आय पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Oscar Nominations 2023: ऑस्करमध्ये आरआरआरचा धमाका!  नाटू नाटू गाण्याला मिळालं नॉमिनेशन