Akeli Box Office Collection Day 1 : नुसरत भरूचाचा (Nushrratt Bharuccha) चित्रपट 'अकेली' 25 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत आहे. नुसरत भरुचा या चित्रपटाची नायिका आहे. आयुष्मान खुरानाचा 'ड्रीम गर्ल 2' सोबतच नुसरत भरुचाचा 'अकेली' देखील या शुक्रवारी रिलीज झाला आहे. या मोठ्या चित्रपटासमोर अकेली चित्रपटाने किती कमाई केली? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 


'अकेली' चित्रपटाला आणि नुसरत भरूचाच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण तरीही पहिल्याच दिवशी चित्रपट चांगले कलेक्शन करू शकला नाही. चित्रपटाला खूपच खराब ओपनिंग मिळाली आहे. पहिल्या दिवशी केवळ चित्रपटाने 20 लाखांचे कलेक्शन केले आहे. 'गदर 2' आणि 'ओएमजी 2' हे दोन चित्रपट अकेली चित्रपटावर भारी पडले आहेत. दरम्यान, आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांचा 'ड्रीम गर्ल 2' देखील 25 ऑगस्ट रोजी रिलीज झाला, ज्याने बॉक्स ऑफिसवर सुमारे 9.70 कोटींची कमाई केली आहे. याआधी हा चित्रपट 18 ऑगस्टला रिलीज होणार होता. पण नंतर निर्मात्यांनी तारीख बदलली. 


'अकेली' या सिनेमाचं कथानक काय आहे? (Akeli Movie Story)


ज्योती या तरुणीने कर्ज फेडण्यासाठी आणि घर चालवण्यासाठी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला. एका वृद्ध व्यक्तीची नोकरी वाचवण्यासाठी तिने देशातील नोकरीचा त्याग केला आहे. घरी ती मोसुल (इराक) ला जाताना मस्कतला जाण्याबद्दल सांगते. चांगल्या पगाराची हाव. ती मोसुलला पोहोचते पण काही दिवसांनी ISIS चा हल्ला होतो आणि इतर अनेक मुलींसोबत तिलाही दहशतवादी लोक घेऊन जातात. आता पुढे काय होतं, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमाचा पाहावा लागेल. प्रणय आणि गुंजन सक्सेना यांनी मिळून 'अकेली' या सिनेमाची कथा लिहिली आहे.


ओएमजी 2 चे कलेक्शन 


SacNilk च्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमारच्या ओएमजी 2 या चित्रपटानं 13 व्या दिवशी जवळपास 3 कोटींची कमाई केली आहे. त्यानंतर आता या चित्रपटाचं एकूण कलेक्शन जवळपास 123.72 कोटी झाले आहे. वीकेंडला ओएमजी 2 चित्रपटाचे कलेक्शन वाढेल आणि हा चित्रपट 150 कोटींच्या क्लबमध्ये सामी होईल, असा अंदाज लावला जात आहे.


'गदर 2' नं केली कोट्यवधींची कमाई


SacNilk च्या रिपोर्टनुसार गदर 2 चित्रपटाने 13 व्‍या दिवशी सुमारे 10.40 कोटी कमावले आहेत. त्यानंतर त्याचे एकूण कलेक्शन 411.10 कोटी होईल. गदर-2 चित्रपटामध्ये अमिषा पटेल आणि सनी देओल यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Dream Girl 2: आयुष्मानच्या ड्रीम गर्ल-2 चा बॉक्स ऑफिसवर कल्ला; पहिल्या दिवशी केली कोट्यवधींची कमाई