Anil Kapoor Was Not First Choice For MR. India: बॉलिवूडच्या (Bollywood Movie) काही कल्ट सिनेमांपैकी एक म्हणजे, अनिल कपूर (Anil Kapoor) आणि श्रीदेवी स्टारर 'मिस्टर इंडिया' (MR. India). या सिनेमात इतरही अनेक सुपरस्टार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकले होते. 'मिस्टर इंडिया' हा सिनेमा 80 आणि 90 च्या दशकातला सुपरहिट सिनेमा. एका वेगळ्या धाटणीचा काल्पनिक कथेवर आधारित हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) खूप चालला. या सिनेमात एक हिरो आहे, ज्याला असं एक घड्याळ सापडतं, ज्याच्या मदतीनं तो अचानक गायब होण्याची 'सुपर पॉवर' मिळते. या पॉवरच्या जोरावर हिरो थेट सिनेमातला खलनायक मोगॅम्बोला सामोरा जातो आणि जिंकतो. बॉलिवूड सुपरस्टार अनिल कपूर (Bollywood Superstar Anil Kapoor) या सिनेमात मुख्य भूमिकेत म्हणजेच,  'मिस्टर इंडिया'च्या भूमिकेत झळकलेला. 

अनिल कपूर (Anil Kapoor) या सिनेमात काही दत्तक मुलांना सांभाळत असतो. या सिनेमात मुलांशी असलेलं त्याचं नातं, सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांच्यासोबतची त्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. याव्यतिरिक्त अनिल कपूर खलनायक मोगॅम्बोला भिडताना दिसला आहे. फक्त भिडत नाही, तो खलनायकाचा खात्मा करतो आणि जिंकतो. अनिल कपूर यांनी हे पात्र एवढ्या काटेकोरपणे साकारलं होतं की, ते पाहुन तुम्हाला वाटेल की, ते जणू त्यांच्यासाठीच लिहिलेलं होतं. पण, तुम्हाला एक गंमत माहितीय का? 'मिस्टर इंडिया'साठी अनिल कपूर कधी पहिली पसंत नव्हतेच. 

'मिस्टर इंडिया'साठी अनिल कपूर यांना पहिली पसंती नव्हती 

IMDB वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, अनिल कपूरची मिस्टर इंडियामधील भूमिका सर्वात आधी महानायक अमिताभ बच्चन यांना ऑफर करण्यात आली होती. दरम्यान, बिग बींनी ही भूमिका करायला नका दिला. कारण त्यावेळी त्यांना राजकारणात नशीब आजमावण्याचा निर्णय घेततेला. तसे ते राजकारणात सक्रियसुद्धा झालेले, जास्त सिनेमे करत नव्हते. अमिताभ बच्चन यांनी स्वतः ती नाकारली. त्यानंतर अनुपम खेर यांच्याही हातून ही फिल्म निसटल्याचं त्यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितलेलं. बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचा प्रसिद्ध खलनायक मोगॅम्बोसाठी अनुपम खेर यांना विचारणा झालेली. पण काही कारणास्तव अचानक त्यांना सिनेमातून काढून अमरिश पुरींना या सिनेमासाठी घेण्यात आलेलं. 

अनुपम खेर यांना 'मिस्टर इंडिया' काढलेलं? 

दिग्दर्शक शेखर कपूर यांची 'मिस्टर इंडिया' सिनेमात अनुपम खेर यांनी मोगॅम्बोची भूमिका साकारावी, अशी इच्छा होती. पण, त्यानंतर मात्र ही भूमिका अमरीश पुरींना देण्यात आली. कारण, त्यांना 'मोगॅम्बो' भूमिकेसाठी असा व्यक्ती हवा होता, जो लोकांना घाबरवेल. जेव्हा अमरीश पुरींनी मोगॅम्बो साकारला, त्यावेळी त्यांनी रुपेरी पडद्यावर त्याला अजरामर केलं. पण, हे पात्र बॉलिवूडमधील सर्वात खुंखार आणि क्लासिक खलनायकांपैकी एक आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

90 मिनिटं, तीन सुपरस्टार्स अन् 2.5 कोटींचं बजेट; सुपरहिट ठरलेल्या कल्ट फिल्मनं कमावलेले 7 कोटी, थरकाप उडवणारी अनुराग कश्यपची 'ही' फिल्म पाहिली?