Urmila Matondkar Starrer Anurag Kashyap Film: बॉलिवूडच्या (Bollywood News) टॉप निर्मात्यांमध्ये समाविष्ट होणारा अनुराग कश्यप (Anurag Kashyap) त्याच्या अनेक कल्ट फिल्म्ससाठी ओळखला जातो. 'गँग्स ऑफ वासेपूर' (Gangs of Wasseypur), 'महाराजा' (Maharaja), 'देव-डी' (Dev D) यांसारखे सुपरहिट सिनेमे अनुराग कश्यपनं बॉलिवूडला (Bollywood) दिले. इतरही अनेक सिनेमांमधून अनुराग कश्यपनं आपली शैली प्रेक्षकांपर्यंच पोहोचवली. अनुराग कश्यपनं आपल्या रिअॅलिस्टिक सिनेमांमुळे आपला एक वेगळा चाहता वर्ग बनवला आहे. त्याच्या सिनेमांची कथा, त्याच्या सिनेमांचं दिग्दर्शन इतकं उत्तम की, प्रेक्षक त्याच्या सिनेमांवरुन नजर हटवू शकत नाहीत... असाच एक सिनेमा 'कौन' (Kaun Movie) अनुराग कश्यपनं लिहिलेला, ज्या सिनेमानं सर्वांनाच स्तब्ध केलं. या चित्रपटाचं नाव, 'कौन' (Kaun). त्याचं दिग्दर्शन राम गोपाल वर्मा (Ram Gopal Verma) यांनी केलं होतं. 90 मिनिटांच्या या सिनेमानं बराच गोंधळ निर्माण केलेला आणि बॉक्स ऑफिसवर चांगली कमाईसुद्धा केलेली.
राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'कौन' सिनेमात (Kaun Movie) मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee), उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) आणि सुशांत सिंह (Sudhant Singh) हे महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसले. तिघांनीही त्यांच्या अभिनयानं सर्वांना प्रभावित केलं. हा एक क्राईम-थ्रीलर सिनेमा आहे.
सिनेमाची कथा काय?
एका रात्री सोसाट्याचा वारा आणि पाऊस कोसळत असतो. त्या वादळी रात्री टीव्हीवर घोषणा होते की, एक खुंखार खुनी बाहेर फिरतोय. अशा परिस्थितीत, एक महिला तिच्या घरात एकटी राहत असते आणि तेवढ्यात तिच्या घराची बेल वाजते. दारावर एक अनोळखी व्यक्ती असते आणि ती घरात येण्याची विनंती करते. त्याचवेळी त्याच्यासोबतच आणखी एक व्यक्ती घरात येते... पण, त्यानंतर जे काय होतं, ते मात्र हादरवणारं आहे. थ्रील आणि सस्पेन्सनं भरलेला हा सिनेमा तुमच्या काळजाचा ठोका चुकवल्याशिवाय राहणार नाही. अनेक ठिकाणी हा सिनेमा तुम्हाला अनपेक्षित वळणावर घेऊन जातो.
अनुराग कश्यपच्या 'कौन'चं दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केलेलं. हा सिनेमा नव्वदच्या दशकात सुपरडुपर हिट ठरलेला. अनुराग कश्यपचा हा पैसा वसूल सिनेमा बॉक्स ऑफिसवरही सुपरहिट ठरलेला. या चित्रपटानं बजेटपेक्षा दुप्पट कमाई केली. हा चित्रपट 2.5 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आलेला आणि त्यानं बॉक्स ऑफिसवर 7 कोटींची कमाई केली. सध्या सस्पेन्स, थ्रीलर सिनेमांचा ट्रेन्ड सुरू आहे. तुम्हीही अशाच क्लासी फिल्मच्या शोधात असाल, तर अनुराग कश्यपचा 'कौन' एकदा तरी नक्की पाहा.
महत्त्वाच्या इतर बातम्या :