मुंबई : Nora Fatehi आपला डान्स आणि आपल्या ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते. 'दिलबर दिलबर..' हे गाणं कमी वेळातच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलं होतं. या गाण्यातील हॉट डान्स आणि अदांमुळे प्रेक्षकांची नोराने वाहवा मिळवली होती. आता नोरा पुन्हा एकदा नव्या व्हिडीओसह चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी आली आहे. Buss It Challenge म्युझिक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ काही तासांपूर्वीच पोस्ट केला असून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
नोराचा हा व्हिडीओ 11 मिलियन्सपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. नोराने इन्स्टाग्रामवर हे शेअर केला आहे. बॉलीवूडमधील कोणत्याही गाण्याला एका दिवसात एवढी पसंती मिळत नाही. परंतु अभिनेत्री नोरा फतेही (Nora fatehi) चे क्लासी फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात.
नोरा सध्या बॉलीवूडची सर्वात प्रसिद्ध डान्सर आहे. फक्त भारतातच नाही तर परदेशात देखील नोराचा मोठा चाहतावर्ग आहे. नोराच्या या सिल्वर मेटॅलिक ड्रेसला इंटरनॅशनल डिझायनर जियानिना अजारने डिझाईन केले आहे.
काही दिवसांपूर्वी नोरा फतेहीचे इन्स्टाग्रामवर 20 मिलियनहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. नोराने यानिमित्ताने फॅन्ससाठी एक स्पेशल व्हिडीओही तयार करून सोशल मीडियावर शेअर केला होता. व्हिडीओमध्ये नोराने आपल्या मित्रांसोबत केकही कापला. तसेच नोराने इन्स्टाग्रामवर लिहिलं होते की; 'आम्ही करुन दाखवलं, माझे इन्स्टाचे चाहते आणि मला सपोर्ट करणाऱ्यांचे मनापासून आभार. मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करते. ही फक्त एक सुरुवात आहे.'