Nora Fatehi : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर  नोरा फतेही (Nora Fatehi)सध्या डान्स दिवाने ज्युनियर्स (Dance Deewane Juniors) या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या कार्यक्रमाचे नोरा परीक्षक आहे. डान्स दिवाने ज्युनियर्स  या शोमध्ये लहान मुलं त्यांच्या नृत्यशैलीनं प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. डान्स दिवाने ज्युनियर्स कार्यक्रमाच्या सेटवरील काही कॉमेडी व्हिडीओ नोरा सोशल मीडियावर शेअर करते. नुकताच नोराचा एक व्हिडीओ  सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती 'मी प्रेग्नंट नाहीये...' असं म्हणताना दिसत आहे. 


डान्स दिवाने ज्युनियर्स या कार्यक्रमाचे  मर्सी, नीतू कपूर आणि टेरेंस लुईस हे परीक्षण करतात. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मर्सी, नीतू कपूर आणि टेरेंस लुईस हे गप्पा मारताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये मर्सी म्हणतो, 'आम्ही तिघे प्रेग्नंसीमध्ये होणाऱ्या त्रासाबद्दल गप्पा मारत होतो. तर नोरा ही स्वत:ला पाहण्यात व्यस्त आहे.' यावर नोरा उत्तर देते, 'कारण मी प्रेग्नंट नाहीये.' यावर मर्सी म्हणते, 'हे लोकांना सांगितल्याबद्दल, धन्यवाद ' त्यानंतर सर्वजण हसतात. 


पाहा व्हिडीओ:






व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नोका पिंक कलरची साडी, डीपनेक ब्लाऊज आणि पिंक कलरची ज्वेलरी अशा लूकमध्ये दिसत आहे. नोरा तिच्या डान्सनं अनेकांची मनं जिंकते. दिलबर दिलबर, हाय गरमी या गाण्यांमधील नृत्यामुळे नोराला विशेष लोकप्रियता मिळाली. झलक दिखला जा ,बिग बॉस-9, कॉमेडी नाइट्स बचाओ ,डान्स प्लस 4 या शोमधून नोरा प्रेक्षकांच्या भेटीस आली. 'रोअर: टायगर्स ऑफ सुंदरबन' या चित्रपटातून नोराने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.  


नोरासोबतच्या नात्याबबात टेरेंसनं दिली माहिती 


एका मुलाखतीमध्ये टेसेंसनं सांगितलं होतं की, त्याची आणि नोराची केमिस्ट्री चांगली आहे. पुढे तो म्हणाला, 'मी तिला डेट करत नाहीये. लोक अफवा पसरवत आहेत. नोरा खूप चांगली आहे. आमच्यामध्ये मैत्री आहे.' टेरेंसला मुलाखतीमध्ये विचारण्यात आले की, तु आणि नोरा एकमेकांना डेट करत आहात का? त्यावर टेरेंसनं हसत उत्तर दिलं, 'हे गुपित आहे. मी तुला याबाबत ऑफ कॅमेरा सांगेन.'


हेही वाचा:


Nora Fatehi : नोरा फतेही कोट्यवधींची मालकीन; एका गाण्याचे घेते 'एवढे' मानधन