Nora Fatehi : दिलबर गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या नृत्यशैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. नोरानं अनेक आयटम साँगमध्ये काम केले आहे. तिचा जन्म कॅनडा येथे झाला. हार्डी संधूच्या 'नाह' या गाण्यामुळे नोराला विशेष लोकप्रियता मिळाली. या गाण्यातील नोराच्या हटके स्टाईलनं अनेकांचे लक्ष वेधले. हे गाणं हिट झाल्यानंतर नोराने अनेक टी- सीरिजच्या गाण्यांमध्ये काम केलं. नोराला अनेका वेळा बेस्ट डान्सर या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. जाणून घेऊयात नोराच्या संपत्तीबाबत...

रिपोर्टनुसार नोरा एका गाण्यात काम करण्यासाठी 40 लाख मानधन घेते. जेव्हा तिचे गार्मी हे गाणे हिट झाले तेव्हा नोरानं तिचे मानधन वाढवले. एखाद्या जाहिरातीमध्ये काम करण्यासाठी पाच लाख घेते. नोराची एकूण संपत्ती 12 कोटी रूपये आहे. ती दरवर्षी दोन कोटी रूपये कमावते. 

नोरानं वरूण धवन, श्रद्धा कपूर, नेहा कक्कड, जॉन अब्राहम आणि सलमान खान या प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले आहे. तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. झलक दिखला जा ,बिग बॉस-9, कॉमेडी नाइट्स बचाओ ,डान्स प्लस 4 या शोमधून नोरा प्रेक्षकांच्या भेटीस आली. 'रोअर: टायगर्स ऑफ सुंदरबन' या चित्रपटातून नोराने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.  

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha