Nora Fatehi Instagram video about Iran Israel conflict: सध्या मध्य पूर्वेतील देशांची परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे.   अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्तपणे इराणवर हल्ला केला. इस्त्रायलसोबतच्या तणावादरम्यान,  इराणने युएईसह आठ देशांवर हल्ला केला.  इराणने दुबईवर क्षेपणास्त्रे डागली.  या तणावादरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही नेमकी आहे तरी कुठे?  असा प्रश्न उपस्थित होत आहे. तिचा बऱ्याचदा दुबई दौरा होत असतो.  कामानिमित्त तिची अनेकदा दुबईवारी होत असते. या तणावादरम्यान, तिनं व्हिडिओद्वारे आपल्या ठावठिकाण्याबाबत सांगितले. ती सध्या भारतात आहे, हे व्हिडिओतून स्पष्ट झाले आहे. सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Continues below advertisement

इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करताना नोरा फतेही म्हणाली, 'बरेच लोक माझी विचारपूस करत आहेत. मी ठीक आहे का? मी कुठे आहे? असा प्रश्न विचारत आहेत. मी पूर्णपणे ठीक आहे. मी दुबईमध्ये नाही, भारतात आहे', अशी माहिती अभिनेत्रीनं दिली. 'जे काही घडत आहे, त्यामुळे मी पूर्णपणे अस्वस्थ आहे. समोर येणाऱ्या दृश्यांनी मला पूर्णपणे हादरवून टाकले आहे. आपल्या सर्वांना शांतता हवी आहे. संपूर्ण जगाला शांतीची गरज आहे. प्रत्येकाला त्यांचे जीवन जगण्याचा अधिकार आहे.  पण उद्या काय होईल, याची भीती लोकांच्या मनात आहे', असं म्हणत नोराने आपल्या भावना व्यक्त केल्या.

 नोरा फतेही आपल्या व्हिडिओत म्हणाली, 'जे काही घडत आहे, हे दृश्य पाहून मला खूप दु:ख झाले आहे. कारण निष्पाप जीवांचा बळी जाऊ नये, असे वाटते.  आम्ही या सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत.  आपण सर्वांना प्रार्थना करण्याची गरज आहे. जागतिक स्तरावर  जे घडत आहे, ते आमच्या नियंत्रणाबाहेर आहे. हे सगळं दुर्देवी आहे', असं आपल्या व्हिडिओत नोरा म्हणाली.

Continues below advertisement

 

'परिस्थिती बिघडेल आणि सुधारण्यापूर्वी अजून खराब होऊ शकते. सत्तेत बदल होईल.  एक नवीन जागतिक व्यवस्था उदयास येईल आणि त्यावर आपले नियंत्रण राहणार नाही. दुर्दैवाने नेहमीप्रमाणे तेच लोक किंमत मोजतील आणि आपण सर्वांना  मानसिक, आध्यात्मिक  आणि आर्थिकदृष्ट्या त्याचा परिणाम भोगावा लागेल',  नोराने यावेळी नागरिकांना  सुरक्षित ठिकाणी राहण्याचा आणि देवाला प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.