Actress Nivetha Pethuraj Wedding Called Off: स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांचं लग्न मोडलं. लग्नाच्या आदल्या रात्रीच दोघांचं लग्न पुढे ढकलण्यात आलेलं, त्यानंतर अख्खं वऱ्हाड परतलं, अनेक दिवस तर्क-वितर्क लावले गेले, पण अखेर स्मृती मानधनानं तिच्या ऑफिशियल अकाउंटवरुन पोस्ट करुन लग्न मोडल्याचं जाहीरपणे सांगितलं. अशातच स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल पाठोपाठ आणखी एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं लग्न मोडल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अभिनेत्रीचा संसार थाटण्यापूर्वीच मोडल्याचं बोललं जातंय. अभिनेत्रीनं तिच्या सोशल मीडियावरुन साखरपुड्याचे सर्व फोटो डिलीट केले असून होणाऱ्या नवऱ्यालाही अनफॉलो केलं आहे.  

Continues below advertisement

दक्षिण भारतीय अभिनेत्री (South Actress) निवेथा पेथुराज (Nivetha Pethuraj) बद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्रीनं साधारणतः तीन महिन्यांपूर्वीच शाही थाटात तिचा साखरपुडा उरकला होता. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावरही शेअर केलेले. पण आता तिनं सोशल मीडियावरुन सर्व फोटो डिलीट केले आहेत. त्यामुळे साखरपुडा झाल्यानंतर अवघ्या तिनच महिन्यांत अभिनेत्रीचं लग्न मोडल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

जवळपास दोन वर्षांपासून सिनेसृष्टीपासून दूर असलेली निवेथा पेथुराज नोव्हेंबरमध्ये सोशल मीडियावर परतली आणि तिच्या लग्नाची घोषणा केली. तिनं दुबईतील व्यावसायिक राजहित इब्रानची (Rajhith Ibran) ओळखही करून दिलेली. मग असं काय घडलं, ज्यामुळे निवेथा पेथुराजचं लग्न मोडल्याच्या चर्चांना उधाण आलंय? 

Continues below advertisement

निवेथानं साखरपुड्याचे फोटो केले डिलीट 

निवेथा पेथुराजनं तिच्या सोशल मीडिया हँडल्सवरुन तिच्या साखरपुड्याचे फोटो डिलीट केले आहेत. इंस्टाग्रामवर तिच्या साखरपुड्याचे कोणतेही फोटो नाहीत. द हंस इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, निवेथा आणि तिची मंगेतर राजहित यांनी एकमेकांना अनफॉलो केलंय आणि फोटो डिलीट केले आहेत, असं देखील म्हटलं जातंय. दरम्यान, दोघांनीही खरोखरंच फोटो डिलीट केले आहेत की, काही तांत्रिक बिघाड आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

पलाश आणि स्मृती मानधनाच्या मोडलेल्या लग्नाशी होतेय तुलना? 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका रिपोर्टमध्ये म्हटलंय की, निवेथाचे चाहते आता तिच्या मोडलेल्या लग्नाची तुलना पलाश आणि स्मृतीच्या मोडलेल्या लग्नाशी करत आहेत. स्मृती आणि पलाशनंही आपल्या साखरपुड्याचे फोटो डिलीट केलेले आणि त्यानंतर कन्फर्म केलेलं की, त्यांचं लग्न मोडलंय. दरम्यान, निवेथानं आतापर्यंत या प्रकरणावर मौन बाळगलं आहे. तसेच, या प्रकरणावर कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. अशातच आता चाहत्यांमध्ये निवेथा कमबॅक करणार की, नाही? यावरही चर्चा रंगल्या आहेत. सध्या तरी निवेथानं यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. 

निवेथा पेथुराज कोण? 

निवेथा पेथुराजच्या करियरबाबत बोलायचं झालं तर, तिनं 2016 मध्ये तमिळ अभिनेता वीआर दिनेश स्टार 'ओरु नाल कूथु'मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी तेलुगु सिनेमामध्ये एन्ट्री केली. निवेथा पेथुराजनं जयम रवीपासून विजय सेतुपति, प्रभु देवापर्यंत अनेक साऊथ सुपरस्टार्ससोबत स्क्रिन शेअर केली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Arjun Rampal Engagement With Gabriella Demetriades: 53 वर्षांच्या अर्जुन रामपालनं 14 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडसोबत गुपचूप उरकला साखरपुडा; लग्नाआधीच अभिनेता दोन मुलांचा बाप