Continues below advertisement

Nitin Gadkari Reveals Favorite Actress: प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान (Farah Khan) सध्या तिच्या व्हीलॉग्ससाठी चर्चेत आहे. ती सेलिब्रिटींच्या घरात जाऊन त्यांच्या आवडीचे पदार्थ तयार करते. सोनाक्षी सिन्हा, अदा शर्मा, अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी यांसारख्या कलाकारांसह तिनं पदार्थ तयार करून व्हिडिओ शूट केले आहे. तिनं नुकतंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी भेट दिली. फराह खान कूक दिलीपसोबत गडकरी यांच्या दिल्लीतील निवास स्थानी गेली होती. नितीन यांच्याही पत्नीही खास फराह खानला भेटण्यासाठी नागपूरहून दिल्लीला प्रवास केला. यादरम्यान, फराह खानने नितीन गडकरी यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. यादरम्यान, नितीन गडकरी यांनी त्यांच्या विविध योजना आणि सामाजिक कार्याबद्दल माहिती दिली.

फराहचे प्रश्न नितीन गडकरींचं उत्तर

Continues below advertisement

फराह खानने नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना व्हीलॉग शूटदरम्यान, विविध क्षेत्राच्या निगडीत प्रश्न विचारले. फराह खानने नितीन गडकरींना विचारले की, त्यांच्याकडे चित्रपट पाहण्यासाठी वेळ आहे का? गडकरींनी तेव्हा होकारार्थी उत्तर दिले. त्यांच्या घरी थिएटर आहे. त्यानंतर फराह खानने नितीन गडकरींना विचारले की, त्यांनी 'ओम शांती ओम' आणि 'मैं हूं ना पाहिले आहे का?' तेव्हा गडकरींनी हो असे उत्तर दिले. गडकरींच्या उत्तरेतून असे समजते की, त्यांना चित्रपट पाहण्याची नक्कीच आवड असेल.

नितीन गडकरींची आवडती अभिनेत्री कोण? (Who is Nitin Gadkari's favorite actress?)

त्यानंतर फराह खानने नितीन गडकरींना विचारले की, तुमचा आवडता अभिनेता / कलाकार कोण आहे? तेव्हा नितीन गडकरींनी अभिनेता अमिताभ बच्चनचा उल्लेख केला होता. फराह खानने त्यांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल विचारले, तेव्हा नितीन गडकरींनी, रजनीगंधामधील अभिनेत्री विद्या सिन्हा असे उत्तर दिले. नितीन गडकरींना विद्या सिन्हा ही अभिनेत्री आवडत असल्यचं सांगितलं. दरम्यान, विद्या सिन्हा ही अभिनेत्री हयात नाही. 15 ऑगस्ट 2019 रोजी त्यांचे निधन झाले होते.

विद्या सिन्हा नक्की कोण? (Who is Vidya Sinha?)

विद्या सिन्हा रजनीगंधा, छोटी सी बात, पती पत्नी और वो यांसारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखली जाते. 2019 साली त्यांचं निधन झालं होतं. ही अभिनेत्री तिच्या काळातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक होती. सध्या फराह खानचा हा व्हीलॉग व्हायरल होत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

6 पॅक अ‍ॅब्स अन् कातिल नजर! मराठी सिनेसृष्टीतील शाहरूख खान पाहिलंत का? 50शीच्या उंबरठ्यावर जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन