Dharmaveer : सध्या धर्मवीर (Dharmaveer) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. शिवसेनेचे लोकप्रिय नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपटामध्ये अभिनेता प्रसाद ओकनं (Prasad Oak) आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. बॉक्स ऑफिसवर देखील हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. अनेक कलाकारांनी तसेच राजकीय नेत्यांनी या चित्रपटाचे कौतुक केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील हा चित्रपट पाहिला. पण चित्रपटाचा शेवट पाहणे त्यांनी टाळले. याचे कारण देखील त्यांनी सांगितले होते ते म्हणाले, 'मी चित्रपटाचा शेवट पाहू शकलो नाही. आनंद दिघे यांच्या अपघातानंतर मी व्यतिथ झालेले बाळासाहेब पहिले आहेत. आनंद दिघे यांचा मृत्यू शिवसैनिकांवर आघात होता.' पण आता यासंदर्भात भाजपचे आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी एक ट्वीट शेअर केले आहे.
नितेश राणेंचे ट्वीट
'दुःखद शेवट पाहू शकणार नाही म्हणून उद्धव ठाकरे यांनी चित्रपटाचा शेवट पाहणे टाळले? असं समजू नका. चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये राज ठाकरे आणि राणे साहेबांची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांनी शेवट पाहिला नाही. यावरुन हे देखील कळते की, शिवसेनेच्या उभारणीत उद्धव ठाकरे हे नव्हते. सत्य नेहमीच बोचरे असते.'
चित्रपटाचा शेवटचा सीन
चित्रपटात शेवटच्या 10 मिनिटांत आनंद दिघे यांच्या जीपला झालेला अपघाताचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. अपघातानंतर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आनंद दिघे, त्यांची सिंघनिया रुग्णालयात विचारपूस करण्यासाठी आलेले राज ठाकरे आणि नारायण राणे तसंच आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर सिंघनिया रुग्णालयात एकत्र धाव घेतलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असे काही प्रसंग चित्रपटाच्या शेवटी दाखवण्यात आले आहेत.
प्रविण तरडे यांनी धर्मवीर या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच झी स्टुडिओज आणि मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
हेही वाचा :
- Chhupe Rustam : रंगभूमीवर नव्या नाटकाची नांदी, ‘छुपे रुस्तम’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हृषिकेश-प्रियदर्शनची जोडी!
- Zollywood : ‘झॉलीवूड’मध्ये झळकणार झाडीपट्टीचे 130 कलाकार, ‘या’ दिवशी चित्रपट रिलीज होणार!
- Dhak Dhak Poster : कुणी बुरखा तर, कुणी परिधान केलाय पंजाबी ड्रेस! बाईकवर स्वार होऊन लडाख राईडला निघाल्या बॉलिवूडच्या स्टार्स