मुंबई : 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाचा अँकर आणि अभिनेता निलेश साबळे झी युवा वाहिनीवरील ‘लाव रे तो व्हिडिओ’ या नव्या कोऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या क्रायक्रमात तो महाराष्ट्रातलं छुपं टॅलेंट शोधणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कलाकारांना महाराष्ट्राचं मनोरंजन करण्याची संधी मिळणार आहे. सध्या लॉकडाऊनमुळे सगळेच घरात अडकले आहेत. अशात घरात राहून तुम्ही तुमच्या घरच्यांचं मनोरंजन कसं करता याचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला पाठवायचा आहे. तुमचा व्हिडिओ निलेश साबळेला आवडला तर तो व्हिडिओ ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या भागात दाखवला जाणार.
भारतात टिकटॉक बॅन झाल्यामुळे करोडो टिकटॉक प्रेमींना आता काय करायचं असा प्रश्न पडला आहे. अनेक मंडळी टिकटॉक स्टार, सेलिब्रिटी झाले होतं. बऱ्याच जणांचं टिकटॉकमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर घर चालायचं. त्यामुळे टिकटॉक बॅन झाल्यानंतर त्यासारख्य़ा भारतीय बनावटीच्या अपची मागणी वाढू लागली आहे.
‘लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तसेच देशातील अनेक मंडळींना एका प्लॅटफॉर्म उपलब्ध झालाय, असं निलेश म्हणाला. " एक अॅप बंद झालं असलं तरी ‘लाव रे तो व्हिडिओ’लाच अॅप समजा आणि त्यासाठी व्हिडीओ पाठवा. टिकटॉक व्हिडीओज् हे फक्त फोन पूरते मर्यादित होते. लाव रे तो व्हिडिओला पाठवलेले व्हिडिओज छोट्या पडद्यावर दाखवले जाणार आहेत. त्यामुळे या संधीचा पूरेपूर फायदा घ्या', असं निलेशनं सांगितलं आहे.
निवडलेले व्हिडिओ ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या भागात दाखवल्यानंतर पाहूणे म्हणून सहभागी झालेल्या सेलिब्रिटींना दाखवले जातील. त्यातून ते जो व्हिडिओ निवडतील त्या स्पर्धकाला त्या भागाचा विजेता घोषित केलं जाईल. प्रत्येक भागाच्या विजेत्याला झी युवा वाहिनीकडून 5000 रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे घरबसल्या व्हिडीओ बनवून पैसे कमावण्याची ही चांगली संधी आहे. प्रत्येक भागातील विजेत्यांना चित्रीकरण पूर्ववत सुरु झाल्यानंतर कार्यक्रमाच्या मंचावरही बोलावण्यात येणार आहे. त्यामुळे टिकटॉकला पर्याय येईपर्यंत आयत्या आलेल्या या संधीचा फायदा घ्या.
India Banned 59 Chinese Apps | भारत सरकारचा चीनला दणका; टिकटॉक, यूसी ब्राऊजरसह कोणते 59 अॅप्स बॅन?