Nilesh Sable new show announcement: झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम प्रचंड गाजला. या कार्यक्रमातील पात्रांची अजूनही चर्चा होते. या कार्यक्रमाने अवघे 10 वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली. केवळ मराठीच नसून, हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही या शोमध्ये हजेरी लावली. शाहरुख खान आणि सलमान खान या कलाकारांनी शोमध्ये उपस्थित राहून मनसोक्त आनंद घेतला. या शोचं सूत्रसंचालन निलेश साबळे करत होता. सूत्रसंचालन करत त्यानं अनेक भागात प्रेक्षकांना आपल्या विनोदाने देखील हसवलं. मात्र, नंतर 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम बंद पडला. दरम्यान, अलिकडेच निलेश साबळेनं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं संकेत दिले आहेत. सध्या निलेश साबळेची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
डॉ. निलेश साबळे सोशल मीडियात प्रचंड सक्रीय असतो. त्याचे पोस्ट व्हायरल होतात. त्यानं नुकतंच एक स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये निलेशने लाल रंगाचा सूट परिधान केला आहे. तो खुर्चीत बसलेला आहे. त्यानं फोटो शेअर करुन, एक लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे. निलेशनं फोटोला 'नवा दिवस, नवा विचार, चला काहीतरी नवीन करुयात...' असे कॅप्शन दिलं आहे. निलेशचीही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. निलेशने आपल्या कॅप्शनमधून नव्या प्रोजेक्टबाबत संकेत दिले आहेत.
नेटकऱ्यांनी निलेशच्या पोस्टवर कमेंट करुन उत्सुकता दर्शवली आहे. 'काही तरी नवीन करा,.. लवकर कळवा', असे कमेंट करुन नेटकऱ्यांनी उत्सुकता दर्शवली आहे. दरम्यान, निलेश साबळे नेमका कोणता नवा प्रोजेक्ट प्रेक्षकांसाठी आणणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. निलेश साबळे आणि भाऊ कदम पुन्हा एकत्र दिसणार का? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. निलेश साबळेला पुन्हा एकदा झी मराठीवर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सध्या निलेश साबळेची ही पोस्ट सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'संजय लीला भन्साळींबाबतच्या अफवा, त्यांना काही झालेलं नाही...'; टीमनं हृदयविकाराचं वृत्त फेटाळलं