Sanjay Leela Bhansali health rumours refuted: प्रसिद्ध बॉलिवूड फिल्ममेकर संजय लीला भन्साळी यांच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली होती. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त समोर आले. मंगळवारी 24 फेब्रुवारी रोजी त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान,  त्यांची तब्येत बिघडली, तसेच त्यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु आहे, अशी माहिती समोर आली होती.   दरम्यान,  त्यांच्या टीमने या वृत्ताला पूर्णपणे फेटाळून लावले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला नसल्याची माहिती त्यांच्या टीमकडून प्राप्त झाली आहे. संजय लीला भन्साळीच्या टीमने  'हे वृत्त पूर्णपणे खोटे आणि निराधार आहे', असे सांगितले आहे. 

Continues below advertisement

24  फेब्रुवारी 1963 रोजी जन्मलेले संजय लीला भन्साळी काल, मंगळवारी त्यांचा  36  वा वाढदिवस साजरा करत होते, असे वृत्त आहे. तेथे आनंदाचे वातावरण होते. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले.  तिथे त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार सुरु आहे, अशी माहिती आहे.  दरम्यान, चित्रपट निर्मात्याच्या टीमने   हे वृत्त फेटाळून लावले आहे. त्यांनी या बातम्यांना निराधार म्हटलं आहे. टीमनं अधिकृत  एक संदेश पाठवला आहे. या संदेशात त्यांनी संजय लीला भन्साळी यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली. 

टीमने संदेशात म्हटले की, 'संजय लीला भन्साळी  रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त पूर्णपणे खोटे  आणि निराधार आहे. या बातमीत कोणतेही तथ्य नाही. आपणास विनंती आहे की, अशा कोणत्याही बातम्या पसरवू नका. कारण यांचे कोणतेही प्रमाणित स्रोत उपलब्ध नाहीत. भन्साळी पूर्णपणे निरोगी आहेत', असं टीमने आपल्या मेसेजमध्ये म्हटले आहे. 

Continues below advertisement

क्लासिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध

 

संजय लीला भन्साळी हे आपल्या क्लासिक आणि भव्य चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत असंख्य चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.  हम दिल दे चुके सनम, देवदास, बाजीराव मस्तानी आणि हिरामंडी त्यांचे हे चित्रपट प्रचंड  गाजले. या चित्रपटांनी प्रेक्षकांना वर्षानुवर्षे भूरळ घातली.  भन्साळींच्या चित्रपटांचे भव्य सेट प्रेक्षकांना इतिहासातील सुवर्ण क्षणांकडे परत घेऊन जातात. त्यांचे चित्रपट हे कायम कला, इतिहास आणि संस्कृतीचे मिश्रण असते.