Nidhi Agrawal: बॉलीवूड असो टॉलीवूड असो किंवा मनोरंजन सृष्टीतील कुठलाही बडा सेलिब्रेटी असो, चाहत्यांचे सेलिब्रेटींविषयीचे वेड काही नवीन नाही. आतापर्यंत असे अनेक स्टार तुम्ही पाहिले असतील ज्यांना चाहत्यांच्या गैरव्यवहाराचा, जवळीकेचा त्रास झाला असेल. एखादा आवडीच्या सेलिब्रेटीला पाहण्यासाठी झुंबड उडाल्याचेही अनेक व्हिडिओ समोर येत असतात. चाहत्यांच्या गर्दीत अडकणं अनेकदा सेलिब्रेटीसाठी डोकेदुखी ठरते. असाच एक थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या समोर आलाय. मुन्ना मायकल या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री निधी अग्रवाल (Nidhi Agrawal) एक विचित्र प्रकार घडलाय. गाण्याच्या लॉन्चदरम्यान आलेल्या निधीला कार्यक्रमातून बाहेर पडताना चहात्यांनी गराडा घातला. शेकडो चहात्यांच्यामध्ये अडकलेल्या निधीला बाहेर पडणं अवघड झालं. तिला तिचा ड्रेस वाचवावं लागल्याचे दिसलं. तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श झाल्याचही या व्हिडिओत दिसतंय. कशीबशी गाडीपर्यंत पोहोचल्यानंतर निधी अत्यंत घाबरली होती.
नेमकं घडलं काय?
निधी सध्या एका चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. एका गाण्याच्या लॉन्चसाठी ती हैदराबादला पोहोचली होती. त्यावेळी चाहत्यांनी तिचा जोरदार स्वागत केले. पण कार्यक्रमाच्या ठिकाणाहून निघताना शेकडो चाहत्यांनी तिला वेढले. चाहत्यांच्या गराड्यात अडकलेल्या निधीला बाहेर पडणं अवघड झालं. या गर्दीनं नंतर नको ते स्वरूप घेतलं. निधीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न होऊ लागला. ढकलाढकलीत तिला स्वतःचा ड्रेस वाचवावा लागला. शेकडो चाहते तिच्यावर अक्षरशः तुटून पडताना दिसतात. शेवटी गार्डस तिला चाहत्यांच्या गर्दीतून गाडीपर्यंत पोहोचवताना दिसत आहेत. कशीबशी गाडीपर्यंत पोहोचल्यानंतर निधीचा जीव भांड्यात पडल्याचं दिसलं. गाडीत बसल्यानंतरही गाडीभोवती चाहात्यांचा गराडा कायम होता. गाडीत बसल्यानंतर निधी अत्यंत घाबरलेली दिसली. 31 सेकंदाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अभिनेत्री सोबत घडलेल्या या विचित्र प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली असून अनेक जण या व्हिडिओवर चिंता व्यक्त करत आहेत. अनेकांनी या व्हिडिओखाली संतापजनक प्रकार असल्याचे लिहीत नाराजी व्यक्त करत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी ही या व्हिडिओवर राग व्यक्त केला आहे. निधी सध्या राजा साहब या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रभासची मुख्य भूमिका आहे.
सोशल मीडियावर संतापाची लाट
निधी अग्रवालच्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. चहात्यांचं वर्तन हे एखाद्या जनावरापेक्षा कमी नसल्याचं काही जणांनी म्हटलंय. तर अनेकांनी या वागण्याचा निषेध केला आहे. चहात्यांनी त्यांची मर्यादा ओलांडल्याचं अनेकांनी लिहिलंय. गायिका चिन्मय श्रीपदानेही या व्हिडिओवर आपला संताप व्यक्त केला असून " जनावरापेक्षाही वाईट वागणारा पुरुषांचा गट होता" असं तिने म्हटलं .चाहते इतक्या वाईट पद्धतीने वागत असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.