Neetu Chandra : अभिनेत्री नीतू चंद्रा (Neetu Chandra) ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. एका मुलाखतीमध्ये नीतू चंद्रानं तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली. तिनं सांगितलं की, एका बिझनेस मॅननं तिला सॅलरीड वाइफ होण्याची ऑफर दिली होती. पत्नी होण्यासाठी नीतूला त्या बिझनेस मॅननं 25 लाख दर महिन्याला मानधन देण्याची ऑफर दिली होती. तसेच नीतूनं एका ऑडिशन दरम्यान घडलेला किस्सा देखील सांगितला. 

नीतू चंद्रानं एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं की, स्वत:च्या प्रवासाकडे तू कशाप्रकारे पाहते? या प्रश्नाला नीतूनं उत्तर दिलं, 'यशस्वी अभिनेत्रीची अयशस्वी गोष्ट' पुढे ती म्हणली, 'अनेक चित्रपटांमध्ये काम करुनही आज माझ्याकडे काम नाहीये, मला एक बिझनेस मॅन म्हणाला होता की तो मला सॅलरीड वाइफ होण्यासाठी 25 लाख दर महिन्याला देईल. तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते आणि कामही नव्हतं. मला या गोष्टीची काळजी वाटत होतं की, एवढं काम करुनही मला अनवॉन्टेड फील झालं.'

ऑडिशन दिल्यानंतर एक तासानं केलं रिजेक्टनीतू म्हणाली, 'एक प्रसिद्ध कास्टिंग डिरेक्टर आहे. मी त्याचं नाव नाही सांगणार. पण त्यानं मला ऑडिशन घेतल्यानंतर एक तासानं सांगितलं की, मला रिजेक्ट करण्यात आलं आहे. माझा आत्मविश्वास कमी होण्यासाठी त्यांनी मला रिजेक्ट केलं होतं. '

गरम मसाला चित्रपटातून बॉलिवूडमध्ये केलं पदार्पण नीतू चंद्रानं 2005 साली प्रदर्शित झालेल्या गरम मसाला या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिनं एअरहोस्टेसची भूमिका साकारली होती. त्यानंतर  ट्रॅफिक सिग्नल, वन टू थ्री, ओय लकी लकी ओय 13बी  आणि अपार्टमेंट या चित्रपटांमध्ये तिनं काम केलं. तिच्या ओय लकी लकी ओय या चित्रपटाला पॉप्युलर फिल्मचा नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. कुछ लव जैसा या चित्रपटामध्ये नीतूनं शेफाली शहा आणि राहुल बोस यांच्यासोबत काम केलं. 

हेही वाचा: