Neena Gupta Wear Glamours Outfit: बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (Nina Gupta) 66 वर्षांच्या झाल्यात. आपल्या वाढदिवशी त्यांनी घातलेला बोल्ड आणि क्लासी आऊटफिट चर्चेचा विषय ठरला. सध्या नीना गुप्ता आपला आगामी सिनेमा 'मेट्रो इन दिनों'मुळे चर्चेत आहेत. त्यांनी आपला वाढदिवसही आगामी सिनेमातील को-अॅक्टर्स आणि क्रूसोबत साजरा केला. यावेळी त्यांनी एक स्टेटमेंट आउटफिट वेअर केलेला. ज्यामुळे सोशल मीडियावर (Social Media) खळबळ उडाली. काहीजण नीना गुप्तांच्या स्टाइलचं विशेष कौतुक करत आहेत, तर काहीजण तिच्यावर खूप नाराज आहेत.
नीना गुप्तांच्या (Neena Gupta Gets Trolled For Wearing Glamorous Outfit) वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर 'मेट्रो इन दिनों'च्या सर्व कलाकारांची प्रेस मीट झाली. त्यावेळी नीना गुप्तांसह आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी आणि दिग्दर्शक अनुराग बसू उपस्थित होते. सिनेमाचं प्रमोशन आणि रिलीज डेट यासर्व गोष्टींवर चर्चा सुरू होत्या. पण, त्या पत्रकार परिषदेत सेंटर ऑफ अट्रॅक्शन होत्या, नीना गुप्ता. सर्वांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या होत्या. त्याचं कारण होतं त्यांनी वेअर केलेला ड्रेस. नीना गुप्ता नेहमीच आपल्या बोल्ड आणि क्लासी लूकसाठी ओळखल्या जातात. यावेळी त्यांनी पांढऱ्या रंगाचं कफ्तान आणि ट्रेंडी 'बिस्किट ब्रा' वेअर केली होती. नीना गुप्तांचा ड्रेस त्यांची मुलगी, प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताच्या फॅशन लेबलचा होता. पण, चाहत्यांना मात्र नीना गुप्तांचा लूक खटकला. फक्त खटकलाच नाहीतर अनेकांनी संतापही व्यक्त केला.
नीना गुप्तांचा 66वा बर्थडे
काही चाहत्यांनी नीना गुप्तांच्या फॅशन सेन्सचं कौतुक केलं, तर काहींनी नीना गुप्तांना सुनावलं आहे. तसेच, त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. तसेच, आपल्या वयाचा विचार करुन कपडे घालायला शिका, असा सल्लाही काही युजर्सनी त्यांना दिला आहे. अशातच त्यांच्या काही चाहत्यांनी त्यांची बाजू लावून धरली आहे.
एका युजरनं लिहिलंय की, चोहिकडून टीकेची झोड उठलेली असताना, तुम्ही महिलांकडून एवढं आत्मविश्वासी असण्याची अपेक्षा कशी करू शकता. तर, दुसऱ्या युजरनं लिहिलंय की, इथे त्वचेचा दिखावा आणि आत्मविश्वासाचा प्रश्न नाही, तर स्वतःच्या हिशोबानं, आपल्याला हवं तसं आयुष्य जगण्याबाबत आहे. जे त्यांना आवडतंय, त्या ते वेअर करुन खूश आहेत.
नीना गुप्तांना लोकांनी सुनावलं
काही लोकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. एकानं म्हटलंय की, इथे आई आतापासूनच आम्हाला सांगतेय, हे सर्व वेअर करुन नका. तर, दुसऱ्या एकानं लिहिलंय की, रेखाजींपेक्षा भारी कुणीच नाही. तर आणखी एका युजरनं लिहिलंय की, स्वतःचं वय तर बघ बाई, अनेकांनी तर नीना गुप्ता यांचे संस्कारही काढले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :