Nawazuddin Siddiqui On Marathi Cinema: मराठी सिनेसृष्टीबाबत (Marathi Film Industry) कित्येकदा अनेकजण वक्तव्य करत असतात. अनेकदा मराठी सिनेमांना (Marathi Movie) शो मिळत नाहीत, मराठी सिनेमे बॉक्स ऑफिसवर (Box Office) चालतही नाहीत. असं घडत होतं, पण ते पूर्वी... आता मात्र मराठी सिनेमांना, नाटकांना चांगले दिवस आलेत. हे आम्ही नाहीतर बॉक्स ऑफिसचे आकडे आणि नाट्यगृहांबाहेर झळकणारे हाऊसफुल्लचे बोर्ड सांगतायत. मराठी इंडस्ट्रीत सध्या साकारात्मक बदल दिसून येत आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 'एप्रिल मे 99', 'गुलकंद', 'जारण', 'आता थांबायचं नाय' यांसारख्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. समीक्षकांनीही त्यांचं भरभरुन कौतुक केलं. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनी मराठी रंगभूमीचं तोंडभरुन कौतुक केलेलं. त्यावेळी त्यांनी 'देवबाभळी' नाटकाचा आवर्जुन उल्लेख केलेला. अशातच आता बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीनंही (Bollywood Actor Nawazuddin Siddiqui) मराठी सिनेमा आणि मराठी कलाकारांचं (Marathi Celebrity) तोंडभरुन कौतुक केलं आहे. 

Continues below advertisement

Telly Talk India या यूट्यूब चॅनलला नवाजुद्दीन सिद्दिकीनं मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला की, "मराठीत नेहमीच चांगले सिनेमे बनत आले आहेत. मी तर म्हणतो की, बॉलिवूडपेक्षा चांगले सिनेमे मराठी इंडस्ट्रीत बनतायत. 'फँड्री', 'कोर्ट' यांसारखे अनेक उत्तम चित्रपट मराठी सिनेसृष्टीत तयार झाले आहेत." 

मराठी चित्रपटांच्या यशाचं कारण सांगताना नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, "त्याचं कारण हे आहे की, मराठीतल्या सगळ्या कलाकारांना नाटकाची पार्श्वभूमी आहे. मराठीमधील सगळेच कलाकार नाटकातून येत असल्यामुळे ते अभिनयाचा खूप सराव आणि तालमी करतात. अभिनयाची उत्तम जाण आणि उत्तम क्षमता असलेले अनेक कलाकार मराठी इंडस्ट्रीत आहेत. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की, त्यांना जे स्थान मिळायला हवं, ते स्थान अजून मिळालेलं नाही."

बिग बजेट मराठी सिनेमा यायला हवा : नवाजुद्दीन सिद्दीकी

यावेळी नवाजुद्दीन सिद्दीकीनं एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. "मला असं वाटतं की, या सगळ्या उत्तम कलाकारांना घेऊन एखादा बिग बजेट चित्रपट बनवला जाईल किंवा या कलाकारांना जेव्हा स्टार बनवलं जाईल, तेव्हा आणखी सकारात्मक बदल होऊ शकतो." त्यावेळी मराठीतील आवडीच्या चित्रपटाबाबत विचारल्यावर नवाजुद्दीन म्हणाला की, "मराठीत दरवर्षी अनेक चित्रपट येत असतात आणि हे सगळेच चित्रपट चांगले असतात."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Web Series Review Vaazha Movie: 7.3 IMDb रेटिंग असलेला सिनेमा, तोंडचं पाणी पळवणारा क्लायमॅक्स; 5 मित्रांची कहाणी तुम्हाला चक्रावून सोडेल