Navjot Singh Sidhu Archana Puran Singh fees for the great indian kapil show : अभिनेत्री अर्चना पूरण सिंह आणि कॉमेडी शोचं नातं खूपच जुने आणि घट्ट आहे. सध्या त्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा महत्त्वाचा भाग आहेत. या शोचा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यावेळी तो अधिक मजेशीर ठरणार आहे, कारण यामध्ये दोन सेलिब्रिटी जज दिसणार आहेत, ज्यामध्ये नवजोत सिंग सिद्धू यांचा देखील समावेश आहे. हा कॉमेडी शो नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. चला जाणून घेऊया की अर्चना पूरण सिंह यांना एका एपिसोडसाठी किती मानधन दिलं जातं आणि आता शोमध्ये पुनरागमन करणाऱ्या सिद्धूंना किती पेमेंट मिळणार आहे.
अर्चना पूरण सिंह प्रत्येक एपिसोडसाठी 10-12लाख रुपये घेतात
'सियासत' या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये जज होण्यासाठी अर्चना पूरण सिंह यांना एका एपिसोडसाठी 10 ते 12 लाख रुपये मानधन मिळतं. मात्र या आकडेवारीची अधिकृत पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही.
'इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या एका मुलाखतीत अर्चना पूरण सिंह यांनी ट्रोलने दिलेल्या एका कमेंटवर आणि कपिल शर्माच्या एका विनोदावर प्रतिक्रिया दिली. त्या विनोदात कपिल म्हणतो की अर्चना या ‘हसण्याच्या बदल्यात पैसे मिळवणाऱ्या’ एकमेव महिला आहेत. यावर प्रतिक्रिया देताना अर्चना म्हणाल्या, ‘‘आता सगळं काही विनोद झालं आहे. कपिल प्रत्येक गोष्टीचा विनोद करतो आणि लोक ते खरं मानतात.’’
अर्चना म्हणाल्या, “होय, मला कॉमेडी शो जज करण्यासाठी पैसे मिळतात. मी हे कॉमेडी सर्कसपासून सुरू केलं. आता मला कपिलच्या शोमध्ये जज म्हणून नाही, तर सेलिब्रिटी गेस्ट म्हणून पैसे दिले जातात. मला हे सुद्धा माहीत नसतं की माझी भूमिका नक्की काय आहे. कपिल सतत चेष्टा करत असतो. मला फक्त हसण्यासाठी पैसे कसे मिळतात? एका अर्थानं सांगायचं झालं, तर मला शो एन्जॉय करण्यासाठी पैसे दिले जातात.”
नवजोत सिंह सिद्धू शोमध्ये अर्चना पूरण सिंहसोबत पुन्हा सहभागी
या नव्या सीझनमध्ये अर्चना पूरण सिंह यांच्यासोबत दुसऱ्या जजच्या भूमिकेत नवजोत सिंह सिद्धू पुन्हा दिसणार आहेत. तब्बल सहा वर्षांनंतर सिद्धू पुन्हा एकदा कपिल शर्माच्या शोमध्ये जज म्हणून पुनरागमन करत आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशभरातून त्यांच्यावर टीका झाली होती, आणि त्यानंतर त्यांनी शो सोडला होता. त्यांच्या जागी अर्चना पूरण सिंह आल्या, आणि तेव्हापासून त्या शोचा भाग आहेत.
‘फिल्मीबीट’च्या अहवालानुसार, सिद्धू प्रत्येक एपिसोडसाठी 30 लाख ते 40 लाख रुपयांच्या दरम्यान मानधन घेणार आहेत. दरम्यान, नवजोत सिंह सिद्धू यांनी बऱ्याच वर्षांपासून कॉमेडी शो जज केलेला नाही. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ 21 जूनपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे, आणि या सीझनचा पहिला सेलिब्रिटी गेस्ट सलमान खान असणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
इन्स्टाग्राम अन् फेसबुकवर मुला-मुलींचे वेडे चाळे सुरु, त्यावर का बोलत नाहीत; राजेश्वरी खरातचा ट्रोलर्सना सवाल