Nauheed Cyrusi on two Miscarriage: अभिनेत्री नौहीद सिरुसी (Nauheed Cyrusi) हिनं अलिकडेच आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक धक्कादायक खुलासा केला. तिनं व्हिडीओ शेअर करत आई न होण्यामागचं कारण सांगितलं. तिनं, सोशल मीडियातून दोन वेळा मिसकॅरेज म्हणजेच गर्भपात झाला असल्याचं उघड केलं. हे समजताच तिच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे.
इन्स्टाग्रामवर एका चाहत्याने अभिनेत्रीसमोर, 'तुम्हाला बाळ का नाही?', असा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली की, 2017 साली रुस्तम कॉन्ट्रॅक्टरसोबत लग्न झालं. लग्नाच्या एक वर्षांनंतर अभिनेत्री पहिल्या मुलाचं स्वागत करणार होती. 2018 साली तिला पहिलं मुल होणार होतं. परंतु, तिसऱ्या महिन्यांत नौहीदचा गर्भपात झाला. या कठीण काळाची आठवण काढत अभिनेत्रीने सांगितलं की, 'शेवटी चेकअपला गेलो होतो, तिथे डॉक्टरांनी सांगितलं की, बाळाच्या हृदयाचे ठोके थांबले आहेत. हे ऐकून मला प्रचंड धक्का बसला', असं अभिनेत्री म्हणाली.
दुसऱ्यांदाही झालं मिसकॅरेज (Nauheed Cyrusi on 2 miscarriage)
पहिल्या गर्भपातानंतर अभिनेत्री आणि तिच्या नवऱ्याने मिळून एका कुत्र्याला पाळलं. नौहीदने सांगितलं की, कोरोना काळात ती दुसऱ्यांदा प्रेग्नेंट झाली होती. पण दुसऱ्यांदाही तिचा गर्भपात झाला होता. सतत दुसऱ्यांदा मिसकॅरेज झाल्यामुळे, तिनं आणि तिच्या नवऱ्याने आपल्या आयुष्याला बघण्याचा दृष्टिकोन बदलला, असं अभिनेत्री म्हणाली.
अभिनेत्री स्पष्ट केलं की, अभिनेत्री आणि तिच्या नवऱ्याचा जगण्याचा उद्देश केवळ आई- वडील होणं नाही, तर गरजू प्राण्यांचीही काळजी घेणं आहे. तिनं सांगितलं की, दोघेही एकत्र मिळून प्रोमोशन न करता पशु कल्याणासाठी काम करत आहेत, गेले अनेक वर्षे दोघेही यासाठी काम करत आहेत, असं अभिनेत्री म्हणाली.
नौहीद हिनं हे देखील सांगितलं की, मुल होण्यासाठी तिनं कोणतेही IVF किंवा फर्टिलिटी ट्रिटमेंटची मदत घेतलेली नाही. जर नशिबात मुल असेल तर, नक्की होईल, असंही अभिनेत्री म्हणाली. व्हिडीओच्या शेवटी नौहीद म्हणाली की, 'मला आशा आहे की, लोकांच्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत', असं अभिनेत्री म्हणाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
