Devoleena Bhattacharjee on flood: पुरामुळे आसाम (Assam) येथील परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे. पावसाचे रौद्ररुप पाहायला मिळत आहे. पुरस्थितीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. काही जण पावसाच्या पाण्यात अडकले आहेत. या भयंकर पुरपरिस्थितीचा (Flood) फटका टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) हिला देखील बसला आहे. अभिनेत्रीची आई पुराच्या पाण्यात अडकली आहे. तिला आपल्या आईच्या सुरक्षेची खूप काळजी वाटत आहे. तिनं यासंदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे.
अभिनेत्री देवोलिनाचा कुटुंब पुराच्या पाण्यात अडकले (Devoleena Bhattacharjee Breaks Down)
देवोलिना चिंतेत आहे. तिने एक व्हिडीओ शेअर करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्रीने सांगितलं की, आई पुराच्या पाण्यात अडकली आहे. ती सध्या हेल्पलेस फिल करत आहे. अभिनेत्रीने स्पष्ट केलं की, ती या कारणामुळे गप्प होती कारण, यावर बोलताना तिचं भावनांवर नियंत्रण राहिलं नसतं. आसाममधील पुराबाबत बोलताना अभिनेत्री म्हणाली की, 'तिथेच माझा जन्म झाला आहे. माझं शाळा आणि कॉलेजचं शिक्षण तिथेच झालं आहे'.
'मी व्हिडीओ या कारणासाठी तयार केला नाही, कारण मला ठाऊक होते की, मला रडू येईल. दुर्देवाने माझी आई नाजिरा येथे अडकली आहे. पण देवाची कृपा आहे, कारण, माझी आई आमच्या जुन्या घरात शिफ्ट झाली आहे. जिथे पुराचा जास्त फटका बसलेला नाही. पण माझी आजी आणि मावशीचं घर पूर्णपणे पुराच्या पाण्यात बुडाले आहे. सगळं काही संपलं आहे', असं म्हणत अभिनेत्री भावुक झाली.
'मला या गोष्टीचं दु:ख आहे की, मी तिथे जाऊ शकलेली नाही. मी एकटी असते, तर नक्कीच गेले असते, पण माझ्याकडे लहान बाळ आहे. अशा परिस्थितीत मी जाऊन सुद्धा काही करु शकलेली नाही. या कारणामुळे मी खूप चिंतेत आहे. इच्छा असूनही मी जाऊ शकली नाही', यावेळी टीव्ही अभिनेत्री भावुक झाली. सध्या तिचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
