Mithun Chakraborty :  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्याहस्ते यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं आहे. नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे 8 ऑक्टोबर रोजी देशातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा राष्ट्रीय पुरस्कारांचा सोहळा पार पडला. ज्येष्ठ बॉलिवुड अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना यंदाचा दादासाहेब फाळके राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसेच वाळवी सिनेमाला यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीमध्ये दाक्षिणात्य सिनेमांची बाजी मारली आहे. 


ऑगस्ट महिन्यामध्ये राष्ट्रीय पुरस्करांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता ऑक्टोबर महिन्यांत या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी तरुण पिढीला संदेशही दिलाय. 


मिथुन चक्रवर्ती यांनी काय म्हटलं?


मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांचा अनुभव सांगत म्हटलं की, 'माझ्या दिसण्यावरुन या क्षेत्रात मला बरेच टोमणे मारण्यात आले. माझ्या दिसण्यावरुन बोललं गेलं. पण मी खचून न जाता स्वत:चं एक वेगळं स्थान या क्षेत्रात निर्माण केलं. सुरुवातीला जेव्हा मला कळलं मला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणार आहे तेव्हा मला खूप आनंद झाला होता आणि माझा विश्वास बसत नव्हता.'


राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची यादी


मल्ल्याळी चित्रपट आट्टम ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर


- सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - गुलमोहर


- सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म - सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - वाळवी


- साहिल वैद्य यांच्या 'मर्मर्स ऑफ द जंगल'ला दोन पुरस्कार


- साहिल वैद्य यांच्या 'मर्मर्स ऑफ द जंगल बेस्ट डॉक्यु्मेंटरी पुरस्कार


- 'मर्मर्स ऑफ द जंगल'ला बेस्ट नॅरेशनचाही पुरस्कार


- सचिन बाळासाहेब सूर्यवंशींच्या 'वारसा'लाही राष्ट्रीय पुरस्कार


- वारसा चित्रपटाला बेस्ट आर्ट कल्चरल फिल्मचा पुरस्कार


- आदीगुंजन (Murmurs of the Jungle) या मराठी चित्रपटाला  सर्वोत्तम निवेदन पुरस्कार, सर्वोत्तम माहितीपट पुरस्कार


- गायक अर्जित सिंह याला  हिंदी चित्रपट 'ब्रह्मास्त्र' साठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार जाहीर


- हिंदी चित्रपट ब्रह्मास्त्रसाठी संगीतकार प्रीतम यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार


- 'कंतारा' चित्रपटासाठी ऋषभ शेट्टी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार


- अभिनेत्री नित्या मेनन हिला तिरुचित्रम्बलम करिता आणि मानसी पारेख हिला कच्छ एक्स्प्रेससाठी संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार


- मल्ल्याळी चित्रपट 'आट्टम'ला सर्वोत्कृष्ट एडिटिंगचा पुरस्कार 


- आनंद एकार्शी यांना 'आट्टम' करिता सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार 


- फौजा चित्रपटासाठी नौशाद सदर खान यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार


-  सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार 'कंतारा' चित्रपटाला जाहीर 


- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – नीना गुप्ता (उँचाई)


- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पवन राज मल्होत्रा ​​(फौजा, हरियाणवी चित्रपट)


- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला)- बॉम्बे जयश्री


- बेस्ट स्टंट कोरियोग्राफी - केजीएफ 2


- बेस्ट एडिटिंग अवॉर्ड - अट्टम (मलयालम)


- बेस्ट प्रोडक्शन डिझाईन - अपराजितो


- बेस्ट बुक ऑन सिनेमा - किशोर कुमार: द अल्टीमेट बायोग्राफी (अनुराधा भट्टाचार्जी, पार्थवि धर)


- स्पेशल मेंशन (म्यूजिक मेंशन) - संजय सलील चौधरी


- बेस्ट एक्शन डायरेक्शन अवॉर्ड - केजीएफ चैप्टर 2 (अनबारिव)


- बेस्ट पार्टी - अपराजितो (सोमनाथ कुंडू)


- बेस्ट प्रोडक्शन डिझाईन - अपराजितो (आनंद आध्या)


- बेस्ट साउंड डिझाईन - पोन्नयिन सेल्वन 1 (आनंद कृष्णमूर्ति)


- बेस्ट सिनेमेटोग्राफी - पोन्नयिन सेल्वन 1 (रवि वर्मन)


-बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट - श्रीपथ (मलिकापुरम)