naomika saran grand daughter of rajesh khanna : बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री डिंपल कपाडियाने दोन दिवसांपूर्वी मुंबईतील एका पार्टीला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी नात नाओमिका सरनही पहिल्यांदाच समोर आलीये. ती राजेश खन्ना यांची नात आहे. तिने या पार्टीत  लगेचच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नाओमिकाने आजी डिंपल कपाडियांसोबत पापाराझींसाठी पोजही दिली. नाओमिकाचा लूक नेटकऱ्यांना खूप आवडला आणि तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. नाओमिका सरन कोण आहे ते जाणून घेऊया? आणि नेटिझन्सनी त्यांच्यावर काय प्रतिक्रिया दिल्या?

नाओमिकाच्या सौंदर्याची नेटकऱ्यांना भूरळ 

नाओमिकाचे रील्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये ती आजीसोबत बाहेर पडताना दिसत आहेत. चाहत्यांनी तिच्या या व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. काहींनी तिला आमची नवी ट्विंकल खन्ना असं म्हटलंय. तर काहींनी ऐश्वर्या आणि कटरीना पेक्षा हिच भारी, अशा आशयाच्या कमेंट्स देखील केल्या आहेत. 

कोन आहे नाओमिका?

नाओमिका सरन ही राजेश खन्ना यांची नात आहे. ती रिंकी खन्ना आणि समीर सरन यांची मुलगी आहे. रिंकी ही राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची दुसरी मुलगी आणि ट्विंकल खन्नाची बहीण आहे. नाओमिका ही अक्षय कुमारची नातेवाईक देखील आहे. ट्विंकलसोबतच्या नात्यामुळे तिला अक्षयची भाची मानले जाईल.

सोशल मीडियावर नाओमिकाची तगडी फॅन फॉलोईंग 

20 वर्षीय नाओमिकाचे सोशल मीडियावर 1,34,000 फॉलोअर्स आहेत. मात्र, ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे काही सांगत नाही. त्याच्या इंस्टाग्रामवर डिंपल, रिंकी आणि कुटुंबातील इतर सदस्यांचे फोटो आहेत. शिवाय तिने जास्त फोटो शेअर करणे देखील टाळले आहे. 

नाओमिका डिंपल कपाडियांसोबत सातत्याने होते स्पॉट  

नाओमिका अनेकदा तिची आजी डिंपल कपाडियासोबत दिसते. 2023 मध्ये पदवीधर झाल्यानंतर त्याने डिंपलसोबतचा त्याचा फोटो शेअर केला. मात्र, नाओमिकाची आई रिंकी प्रसिद्धीपासून दूर राहते. रिंकी खन्नाने 1999 मध्ये 'प्यार में कभी कभी' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि 'मुझे कुछ कहना है', 'झनक बीट्स' आणि 'चमेली' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. यानंतर, मात्र, रिंकीने आपल्या कुटुंबासाठी अभिनयापासून दूर राहणे पसंत केले.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

VIDEO : मोहम्मद शमीच्या घटस्फोटीत पत्नीचा बेडरुममधील 'तो' भन्नाट डान्स पुन्हा व्हायरल, इन्स्टाग्राम दणाणून सोडलं