Hanuman Jayanti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला देशभरात हनुमान जयंतीचा (Hanuman Jayanti) उत्सव साजरा केला जातो. त्यानुसार, यंदा 12 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी करण्यात येणार आहे. असे मानले जाते की, या विशेष दिवशी भगवान शंकराचा 11वा रुद्र अवतार हनुमानाची पूजा करण्याची परंपरा आहे. हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर बजरंगबलीची पूजा केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी येते आणि सर्व दु:ख दूर होतात असे शास्त्रात सांगितले आहे. याशिवाय या विशेष दिवशी राशीनुसार काही खास उपाय करणे देखील फायदेशीर ठरते.
हनुमान जयंतीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा 'हे' उपाय
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी बालकांड पाठ करून कन्या पूजन करावे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांनी 'ओम नमो हनुमंत नमः' या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी विधिवत हनुमान चालिसाचे पठण करावे आणि बजरंगबलीसमोर 11 दिवे लावावेत.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांनी या विशेष दिवशी श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे आणि गरजू लोकांना अन्नदान करावे.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांना हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान अष्टक स्तोत्राचे पठण करण्याचा सल्ला दिला जातो.
कन्या रास (Virgo Horoscope)
हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर कन्या राशीच्या लोकांनी सुंदरकांड पठण करावे आणि गाईला हिरवे गवत दान करावे.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला बजरंग बाण म्हणावी आणि हनुमानजींच्या मंदिरात पिवळी पाने अर्पण करावीत.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
हनुमान जयंतीच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी हनुमान चालिसाचे पठण करावे आणि माकडांना अन्न दान करावे, असा सल्ला ज्योतिष विद्वान देतात.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर हनुमान कवच पठण करावे आणि मंदिरात हनुमान चालिसाचा ग्रंथ भेट द्यावा.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांनी श्री राम मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा आणि हनुमानजींना लाडू अर्पण करावेत.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर कुंभ राशीच्या लोकांनी सुंदरकांडाचे विधिवत पठण करावे आणि हनुमानजींना बेसनाचे लाडू अर्पण करावेत.
मीन रास (Pisces Horoscope) -
मीन राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला अयोध्या प्रसंगाचे पठण करावे आणि गरजू लोकांना अन्न किंवा वस्त्र दान करावे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: