Nanda Karnataki : मनोरंजन उद्योग अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. वेगवेगळ्या कथा लोकांसमोर पडद्यावर मांडल्या जातात, ज्या लोकांना आवडतात आणि कधी कधी टीकाही होते. सिनेमाच्या दुनियेमधील रील लाईफ व्यतिरिक्त, अशा अनेक खऱ्या आयुष्यातील किस्से आहेत जे कोणालाही धक्का देऊ शकतात. अशीच एक गोष्ट अभिनेत्री नंदा कर्नाटकी यांची आहे. नंदा कर्नाटकी यांनी एन्गेजमेंट केली होती, पण कधीही लग्न केले नाही. परंतु विधवा म्हणून आपले जीवन व्यतीत केले. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.


'तुफान और दिया' चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम 


नंदा कर्नाटकी यांचा जन्म 1939 साली झाला आणि त्यांच्या वडिलांचे लहान वयातच निधन झाले. 1948 साली 'मंदिर' चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात करणाऱ्या नंदा कर्नाटकी यांनी 30 वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम केले आहे. नंदा कर्नाटकी यांनी 1956 मध्ये आलेल्या 'तुफान और दिया' चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. नंदा कर्नाटकी यांनी राजेश खन्ना, शशी कपूर यांच्यासह अनेक स्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली आहे.


वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार 


नंदा यांना चित्रपटांमध्ये खूप यश मिळाले पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आले. त्यांना आयुष्यभर बॅचलर राहावे लागले पण विधवा म्हणूनही आयुष्य घालवले. नंदा कर्नाटकी दिग्दर्शक मनमोहन देसाईंच्या प्रेमात पडल्या होत्या. मनमोहन देसाई यांचेही नंदा कर्नाटकींवर प्रेम होते पण ते प्रेम कधीच व्यक्त करू शकले नाहीत, असे म्हणतात. मनमोहन देसाई यांच्याबाबत असे म्हटले जाते की, त्यांनी जीवन प्रभाशी लग्न केले कारण ती नंदा कर्नाटकी सारखी दिसत होती. जीवनप्रभा यांच्या निधनानंतर मनमोहन देसाई आणि नंदा कर्नाटकी यांच्यातील जवळीक वाढू लागली.


मनमोहन देसाई यांचे घराच्या बाल्कनीतून पडून निधन


मनमोहन आणि नंदा कर्नाटकी यांनी त्यांच्या नात्याला नाव देण्याचा निर्णय घेतला आणि एन्गेजमेट केली होती, पण नंदा कर्नाटकी यांच्या आयुष्यात प्रेम लिहिले गेले नव्हतं. त्यांच्या एन्गेजमेटने अवघ्या दोन वर्षांनी, मनमोहन देसाई यांचे घराच्या बाल्कनीतून पडून निधन झाले. मनमोहन देसाई यांच्या निधनाने नंदा उद्ध्वस्त झाल्या होत्या. त्यामुळे लग्न न करता मनमोहन देसाईंची विधवा म्हणून राहण्याचा निर्णय घेतला. असं म्हणतात की नंदा कर्नाटकी कुठेही जायची तेव्हा त्या पांढऱ्या साडीत जायच्या. 2014 मध्ये त्यांचे निधन झाले.


इतर महत्वाच्या बातम्या