Salzer Electronics Share Price मुंबई: तामिळनाडूमधील(Tamilnadu) बेस्ट मल्टीबैगर स्टॉक सेल्जर इलेक्ट्रॉनिक्स (Salzer Electronics) नं गेल्या दोन वर्षात गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. येत्या काही दिवसात या कंपनीच्या शेअर धारकांना गुंतणुकीवर 70 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, असा अंदाज आहे. वेंचुरा सिक्यूरिटीजं गुंतवणूकदारांना हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.


सेल्जर इलेक्ट्रॉनिक्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला  


वेंचुरा सिक्युरिटीजचे (Ventura Securities) इक्विटी ब्रोकिंग सीओओ भारत गाला (Bharat Gala) यांनी सेल्जर इलेक्ट्रॉनिक्च्या शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटलं की सेल्जर इलेक्ट्रॉनिक्स मे 2022 नंतर मुव्हिंग अवरेजवर ट्रेड होत आहे. गेल्या महिन्यात  क्रॉसओव्हर सह The Aroon अप/डाउन, ADX आणि KST इंडीकेटर्स सकारात्मक आहेत. सप्टेंबर 2020 पासून स्टॉकचा सुपरट्रेंड सकारात्मक राहिला आहे.  


2000 हजार रुपयांपर्यंत जाणार


भारत गालांच्या माहितीनुसार सेल्जर इलेक्ट्रॉनिक्सचा शेअर नेहमी हायर बॉटम फॉर्मेशन दर्शवतो. गुंतवणूकदारांनी 950 रुपयांना स्टॉप लॉस लावावा. त्याशिवाय 2000 रुपये टारगेट प्राइस निश्चित केली आहे. वेंचुरा सिक्युरिटीजनं गुंतवणुकीचा सल्ला दिल्यानंतर स्टॉकमध्ये 10 टक्के तेजी आली आहे. सध्या या कंपनीचा शेअर 1310 रुपयावर आहे.  


5 वर्षात 12 पट वाढ


सेल्जर इलेक्ट्रॉनिक्स स्टॉक मल्टीबॅगर शेअर (Multibagger Stock) असून यातून शेअरधारकांनी चांगली कमाई केली आहे. 2024 मध्ये या कंपनीचा शेअर 225 टक्के वाढला आहे. गेल्या दोन वर्षात 417 टक्के, तीन वर्षात 540 टक्के आणि 5 वर्षात या शेअरनं 1200 टक्के परतावा दिला आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच डिसेंबर 2023 मध्ये या कंपनीचा शेअर 223 रुपयांवर होता.  


लॉकडाऊननंतर 23 पट वाढ


करोना महामारीच्या वेळी भारतात 24 मार्च 2020 ला लॉकडऊन लागू करण्यात आलं होतं. तेव्हा स्टॉक 54 रुपयांवर होता. तेव्हापासून आतापर्यंत स्टॉकमध्ये 23 पट वाढ झली आहे. ज्या गुंतवणूकदाराकडे 24 मार्च 2024 या कंपनीचे 1 एक लाख रुपयांचे शेअर असतील. त्यांच्याकडे आता सेल्जर इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअरची किंमत 23 लाख रुपये झाली आहे. या शेअरमधील तेजी पाहता वेंचुरा सिक्युरिटीजनं या शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.  


इतर बातम्या :


Google Search : भारतीयांनी गुगलवर 2024 मध्ये कोणत्या गोष्टी सर्च केल्या, IPL ते रतन टाटा, टॉप 10 गोष्टी कोणत्या?


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)