Nana Patekar On Cigarette Addiction: मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Industry) अवलिया अभिनेता म्हणजे, नाना पाटेकर (Nana Patekar). थिएटरपासून सुरुवात केल्यानंतर नाना पाटेकरांनी सिनेसृष्टीकडे आपला मोर्चा वळवला. त्यानंतर रंगभूमीसोबतच नाना पाटकेरांनी मराठी (Marathi Movie) आणि हिंदी सिनेसृष्टीत (Hindi Film) आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. ना रंगरुप, ना गोरापान रंग तरिही या अभिनेत्यानं आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आणि रुपेरी पडद्यावर त्या अजरामर केल्या. पण, नाना पाटेकरांचं वैयक्तिक आयुष्य फारच खडतर होतं. याबाबत स्वतः त्यांनीच खुलासा केला आहे. 

Continues below advertisement

नाना पाटकेरांनी एका मुलाखतीत बोलताना कबुल केलेलं की, ते दिवसाला तब्बल 60 सिगारेटी ओढायचे. विश्वास ठेवणं कठीण असलं तरीसुद्धा स्वतः अभिनेत्यानं ही बाब जाहीरपणे कबुल केली आहे. तसेच, धूम्रपान सोडण्यासाठी स्वतः काय-काय संघर्ष केलेला याबाबतही नाना पाटेकरांनी सांगितलं. जर तुम्हीही धुम्रपानाच्या अधीन असाल आणि सोडण्यासाठी खूप प्रयत्न करत असाल, तर नाना पाटेकरांच्या या टिप्स उपयुक्त ठरू शकतात. 

माझ्या अंगालाच सिगारेट्सचा वास यायचा : नाना पाटेकर 

लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत बोलताना नाना पाटेकर यांनी सिगारेट्स ओढण्याचा त्यांचा अनुभव सांगितला. नाना पाटेकर म्हणाले की, "मी इतका धूम्रपान करायचो की, माझ्या शरीराला वास येत असे. आंघोळ करतानाही माझ्या हातात एक सिगारेट असायची. मी दररोज सुमारे तीन पॅकेट सिगारेट ओढायचो..." 

Continues below advertisement

"माझी बहीण होती, जिचा एकुलता एक मुलाचं निधन झालेलं, मी सिगारेट ओढत होतो आणि जोरजोरात खोकत होतो... मी खूपच घाणेरड्या पद्धतीनं सिगारेट ओढायचो, माझ्या गाडीतही कुणीच बसायचं नाही... कारण सिगारेटचा वास यायचा खूपच... मग माझ्या बहिणीनं मला खोकताना पाहिलं, तिनं आठ दिवसांपूर्वीच एकुलता एक मुलगा गमावलेला... माझ्याकडे पाहून ती म्हणाली, 'मला आणखी काय-काय पाहायचंय... मला खूपच वाईट वाटलं, त्यादिवशी मी अजिबातच सिगरेट प्यायलो नाही... दुसऱ्या दिवशीही नाही, तिसऱ्या दिवशीही नाही... मग मी मुंबईला आलो... मग तिला फोन केला, कशी आहेस? वैगरे चौकशी केली आणि तिला सांगितलं की, पाच दिवस झाले मी सिगरेट प्यायलो नाही, तेव्हापासून मी रोज स्वतःला म्हणायचो, आज सिगरेट पिणार नाही... आता या गोष्टीला वीस वर्ष झालीत... आजही म्हणतो, आज नाही पिणार आणि सिगरेट सुटली..'

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Salman Khan Wants To Become Parent: 'मला कधी ना कधी मुलं नक्कीच होतील...', सलमान खानला व्हायचंय बाप, पास्ट रिलेशनशिपबाबत म्हणाला...