Salman Khan Wants To Become Parent: बॉलिवूडचा (Bollywood News) दबंग भाईजान सलमान खान (Salman Khan) साठीला टेकलाय, पण अद्याप त्याच्या लग्नाचा काही पत्ता नाही. चाहते अजूनही त्याला अधेमधे विचारतात की, भाईजान लग्न कधी करणार? पण असं असलं तरीसुद्धा सलमान खाननं इंडस्ट्रीचा 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' हा टॅग मिळवला आहे. सलमान खानच्या लग्नाबाबत नेहमीच चर्चा होतात आणि भाईजान अगदी सोयीस्कररित्या त्या टाळतो. पण, सलमान खाननं नुकत्याच एका मुलाखतीत व्यक्त केलेल्या इच्छेमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. लग्नाबाबत नाही, पण सलमान खाननं मुलांबाबत एक इच्छा व्यक्त केली आहे. तुम्ही बघा एक दिवस मलाही मुलं होतील असं वक्तव्य भाईजाननं केलं आहे.
सलमान खान आमिर खानसोबत 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' या चॅट शोमध्ये दिसला. शोमध्य बोलताना सलमाननं वडील होण्याची इच्छा व्यक्त केली आणि लवकरच तो बाबा होणार असल्याचं सांगितलं. त्याच्या मुलांची काळजी कोण घेणार याबाबतही सलमान खाननं स्पष्टच सांगितलं. त्यानं सांगितलं की, मुलांची काळजी घेण्यासाठी त्याचं संपूर्ण कुटुंब मदत करेल, विशेषतः त्याची भाची अलिझेह आणि कुटुंबातील सर्व महिला...
इनसिक्योरिटी मनात घर करते... : सलमान खान
सलमान खान पुढे बोलताना म्हणाला की, "जेव्हा एक जोडीदार दुसऱ्यापेक्षा जास्त प्रगती करतो, तेव्हाच संघर्ष सुरू होतात. तेव्हाच इनसिक्योरिटीची भावना मनात घर करते. म्हणून, त्या दोघांनीही एकत्र पुढे जावे. त्या दोघांनीही एकमेकांचे ओझे हलके करावे. मी तेच मानतो." जेव्हा आमिर खानने सलमानला त्याच्या आधीच्या रिलेशनशिपबद्दल विचारले तेव्हा सलमान खाननं स्पष्ट केलं की, त्याच्यामुळेच त्यांचे नाते पुढे टिकले नाही.
मीच जबाबदार आहे... : सलमान खान
सलमान खान म्हणाला, "नाही जमलं तर नाही जमलं.... जर कोणाला दोष द्यायचा असेल तर मीच जबाबदार आहे." त्यानंतर सलमाननं वडील होण्याची इच्छा व्यक्त केली आणि म्हटलं, "मला कधी ना कधी मुलं नक्कीच होतील. तुम्ही बघालच मलाही मुलं होतील..."
आमीर आणि सलमान यांच्यात घट्ट मैत्री कशी, कधी झाली?
रिना दत्तासोबत घटस्फोटादरम्यान तो सलमानच्या जवळ कसा आला हेही आमिर खानने सांगितले. तो म्हणाला, "खरं तर, मला वाटतं की रीनाशी घटस्फोट झाला तेव्हा असं घडलं. तुला आठवतंय का? तू जेवायला आलेलास आणि तेव्हाच सलमान आणि मी खरोखर एकमेकांशी जोडले गेलो. कारण त्याआधी, मला वाटायचं की तो भाई कधीच वेळेवर येत नाही, आमच्यात खूप समस्या होत्या आणि मला अंदाज अपना अपना मध्ये त्याचा खूप त्रास व्हायचा. मी हे कबुल करीन की मी सुरुवातीला खूप जजमेंटल होतो. मी एक माणूस म्हणून खूप कठोर होतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :