Nana Patekar On Retirement From Film Industry: मकरंद तू आता नाम फाउंडेशनच्या (Naam Foundation) कामात लक्ष दे, मला आता निवृत्ती हवी आहे. मला लोकांच्या विवंचना जाणून घ्यायच्या आहेत. मी नाटक, सिनेमातूनही 99 टक्के निवृत्ती घेतोय, असं म्हणत नाना पाटेकरांनी (Nana Patekar) निवृत्तीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Veteran Actor Nana Patekar) यांनी रविवारी पुणे (Pune News) येथे कार्यक्रमातील भाषणात केलं. त्यावेळी अचानक त्यांनी केलेल्या निवृत्तीच्या वक्तव्यामुळे कार्यक्रमाला वेगळीच किनार लाभली.
'नाम फाउंडेशन'चा (Naam Foundation) दशकपूर्ती सोहळा रविवारी पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडला. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या काही प्रमुख पाहुण्यांची भाषणं पार पडली. त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटकेर यांनी उपस्थितांशी अनौपचारिक संवाद साधला. 'पंचाहत्तरीनंतर नाटक, सिनेमातून निवृत्त व्हावं, असं वाटतं... म्हणजे ज्यातून तुम्हाला खूप काही सांगता येईल, अशी एखादी छान कलाकृती वाट्याला आली, तर ती करीनही; पण आता मला माझ्या पद्धतीनं जगू द्या...", अशी भावूक वक्तव्य नाना पाटेकरांनी केलं आहे.
नाम फाउंडेशनच्या दशकपूर्ती सोहळ्यात नाना पाटेकर बोलताना म्हणाले की, "आजवर खूप काम केलं आहे. त्यामुळे आता मनासारखं जगावं असं वाटत आहे. एक जानेवारीला मी वयाची पंचाहत्तरी पूर्ण करीन. त्यानंतर नाटक, सिनेमातून निवृत्त होऊन गावखेड्यांतील विवंचना समजून घ्याव्यात, त्यांच्यासाठी काही करावं, असं वाटतं. नाम फाउंडेशनची धुराही आता मकरंदनेच पुढे न्यावी... शिवाय कान धरायला आणि पाठीवर थाप द्यायला मी सोबत असेनच..." अशी भावना नानांनी या कार्यक्रमात व्यक्त केली.
"नाम'ची पुढची पिढी उत्तम पद्धतीनं आमचं काम पुढे नेतेय. कामाची व्याप्ती खूप वाढली आहे. आता त्यांनी हे काम पुढे न्यावं. 'नाम'चं पुढील काम मकरंद (अनासपुरे) ठरवेल. मी असेन, तरंच काम करीन, ही त्याची भूमिका चुकीची आहे. 'नाम'सारख्या शंभर संस्था निर्माण झाल्या, तरी समस्या सुटणार नाही...", असंही नाना पाटेकर म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :