Chammak Challo Song Singer Akon Divorce: शाहरुख खानचं (Shah Rukh Khan) प्रसिद्ध गाणं 'छम्मक छल्लो' (Chammak Challo) खूप गाजलेलं. तसेच, या गाण्याच्या गायकालाही मोठी प्रसिद्धी मिळालेली. आजही या गाण्यावर अनेकजण थिरकतात. पण, आता या प्रसिद्ध गाण्याच्या गायकाच्या आयुष्यात खूप मोठं वादळ आलं आहे. सुप्रसिद्ध गायक लग्नाच्या तब्बल 28 वर्षांनी आपल्या पत्नीपासून विभक्त होणार आहे. आपल्या लग्नाच्या 29व्या वाढदिवशीच गायकानं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती मिळत आहे. 

प्रसिद्ध अमेरिकन सिंगर एकॉन (American Singer Akon) आणि त्याची पत्नी टोमेका थियम यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गायकाची पत्नी टोमेकानं कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.  पीपल डॉट कॉमच्या वृत्तानुसार, टोमेकाने तिच्या घटस्फोटाच्या याचिकेत, आपसी मतभेद हे घटस्फोटाचं कारण म्हणून नमूद केलं आहे. दरम्यान, तिनं गायकापासून  विभक्त होण्याची नेमकी तारीख नमूद केलेली नाही आणि ती 'टीबीडी' म्हणजेच अद्याप निश्चित झालेली नाही, असं लिहिलं आहे. याशिवाय मुलीचं पालकत्व मिळण्यासाठी दोघांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. वैवाहिक जीवनातील मतभेद आणि वैयक्तिक कारणांमुळे या दोघांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय.

1996 मध्ये लग्न, आता 28 वर्षांनी काडीमोड

मीडिया रिपोर्टनुसार एकॉन आणि टोमेका यांनी 1996 मध्ये एकमेकांशी लग्न केलं. या दोघांना 17 वर्षांची एक मुलगी असून तिचं नाव जर्नी आहे. आता लग्नाच्या 28 वर्षांनंतर एकॉन आणि त्याच्या पत्नीनं घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. याशिवाय मुलीचं पालकत्व मिळण्यासाठी दोघांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. वैवाहिक जीवनातील मतभेद आणि वैयक्तिक कारणांमुळे या दोघांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय. एकॉनचं मूळ नाव आलियाउने डॅमाला बाडारा अकारा न्डेये (Aliaune Damala Badara Akon Thiam) आहे. एकॉननं टोमेकासोबत नातं अनेक वर्ष खाजगी ठेवलं होतं.

एकॉनच्या कित्येक पत्नी आणि 9 मुलं

52 वर्षांचा एकॉन जगभरात आपल्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. 2011 मध्ये शाहरुख खानच्या 'रा.वन' चित्रपटातील 'छम्मक छल्लो' आणि 'क्रिमिनल' ही सुपरहिट गाणी गाऊन त्यानं बॉलिवूडमध्ये लोकप्रियता मिळवली.

एकॉन नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. त्यानं अनेक वेळा सार्वजनिकरित्या सांगितलंय की, तो एकापेक्षा जास्त लग्न करण्यावर विश्वास ठएवतो. 2022 मध्ये एका मुलाखतीत त्यानं स्पष्टपणे सांगितलं की, त्याला नऊ मुलं आहेत आणि त्याला अनेक बायका आहेत. 2023 मध्ये, सिंगर अमिररनं दावा केला की, ती एकॉनच्या चार बायकांपैकी एक आहे. 

याबद्दल विचारलं असता, एकॉन म्हणाला होता की, "एकापेक्षा जास्त विवाह (Polygamy) हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. आफ्रिकन परंपरांमध्ये ही एक अगदी सामान्य गोष्ट आहे. पाश्चात्य देशांमध्ये गेल्यानंतरही आपण आपली संस्कृती सोडलेली नाही. पाश्चात्य जगानं स्वतःचे नियम बनवले आहेत, पण त्यांनी मानवी स्वभाव विचारात घेतलेला नाही."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bollywood Actor Divorced Due To The Dogs: आमदाराच्या हिरो मुलाची विचित्र प्रेमकहाणी; परदेशी सौंदर्यवतीच्या प्रेमात पडून बांधली लग्नगाठ, पण अखेर कुत्र्यांमुळे घटस्फोट