Namdev Dhasal, Chal Halla Bol Movie : बंडखोर कवी आणि दलित पॅथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ याच्या कवितांवर 'सेन्सॉर बोर्डा'ने आक्षेप घेतलाय. 'चल हल्ला बोल' असे या चित्रपटाचे नाव असून या सिनेमाची कथा दलित पँथर, युवा क्रांती दल या चळवळीवर आधारित आहे. कविता आक्षेपार्ह असल्याचं म्हणत सेन्सॉर बोर्डाने  हा आक्षेप घेतलेला आहे. 

1 जुलै 2024 मध्ये हा चित्रपट मान्यतेसाठी सेन्सॉर बोर्डकडे सबमिट करण्यात आला होता. या सिनेमात पदमश्री कवी नामदेव ढसाळ यांची कविता आहे. सेन्सॉर बोर्डाने या कविता काढायला सांगितल्या आहेत. कवितेत शिव्या आहेत, अश्लीलता आहे, असे मत सेन्सॉर बोर्डाच्या ऑफिसरने मांडलंय. तसेच ढसाळ यांच्याबाबत माहिती दिली असता. कोण ढसाळ आम्ही ओळखत नाही असे उत्तर अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. 

नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित 'चल हल्ला बोल' हा सिनेमा 6 डिसेंबर 2024 रोजी फिल्म रिलीज करायचा होती. मात्र सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्याने रखडली आहे. हा सिनेमा रिवायजिंग कमेटीकडे दिला असून त्याची रीतसर फी भरली आहे. परंतु सेन्सॉर बोर्ड कसलाच प्रतिसाद देत नाहीत. आतापर्यंत अनेक पत्रव्यवहार केले, प्रत्यक्षात ऑफिस भेट दिल्या परंतु "चल हल्ला बोल "साठी कोणता ऑफिसर वेळ देत नसल्याची खंत दिग्दर्शक महेश बनसोडे यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

सेन्सॉर बोर्डाच्या या वर्तवणुकीबाबत दलित समाजात संतापाची लाट असून लवकरच दलित समुदयाकडून सेन्सॉर बोर्डावरच 'चल हल्ला बोल' करत आंदोलन करण्याचा इशारा दलित संघटनानी दिला आहे.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jalgaon Crime : रील स्टार मुलाचा खून करुन मृतदेह धरणात पुरला अन् माजी सैनिक असलेल्या बापानेही आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये मोठा खुलासा

Chhaava Movie Deleted Scene: राजमाता सोयराबाई अन् सरसेनापती हंबीरराव यांच्यातील दमदार संवाद; 'छावा'मधला 'तो' Deleted Scene व्हायरल, सिनेमातून का वगळला?