Nagarjuna Movie The Ghost Teaser: साऊथ सुपरस्टार नागार्जुनच्या (Nagarjuna Akkineni) आगामी चित्रपट 'द घोस्ट'चा (The Ghost) टीझर रिलीज झाला आहे. 'द घोस्ट'च्या टीझरमध्ये अभिनेता नागार्जुन एका खतरनाक अवतारात दिसत आहे. या चित्रपटात नागार्जुनचा अॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. यासोबतच निर्मात्यांनी नागार्जुनचा या चित्रपटातील लूकही शेअर केला आहे. नागार्जुनच्या 'द घोस्ट' चित्रपटाचा हा टीझर व्हिडीओ सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला आहे. चित्रपटाचा टीझर येताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टीझरमध्ये नागार्जुनची स्टाईल आणि थरारक अॅक्शन सीन्सची झलक पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.


यात नागार्जुन सूट-बूट घालून जंटलमन लूकमध्ये दिसत आहे. 50 सेकंदांच्या या टीझरची सुरुवात धमाकेदार अॅक्शनने होते. नागार्जुनच्या दोन्ही हातात तलवार दिसत आहेत आणि त्याच्यासमोर एक संपूर्ण फौज उभी आहे, जिचा सामना तो एकट्याने करत आहे. अवघ्या काही सेकंदातच तो त्याच्या समोर उभ्या असलेल्या सर्व लोकांना ठार मारतो. टीझरमध्ये सर्वत्र रक्त पसरलेले दिसत आहे. टीझरच्या शेवटी नागार्जुनच्या चेहऱ्याची झलकही दाखवली आहे.


पाहा टीझर :



'द घोस्ट'मध्ये अभिनेत्री सोनल चौहान नागार्जुनसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नागर्जुनचा हा चित्रपट 5 ऑक्टोबर 2022 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये याची उत्सुकता निर्माण झाली आहे. नागार्जुन लवकरच या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


‘ब्रह्मास्त्र’मध्येही झळकणार अभिनेता


‘द घोस्ट’ या चित्रपटाशिवाय नागार्जुन लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहेत. याशिवाय या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्याही भूमिका आहेत, त्यामुळे या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा आहे. या चित्रपटाचा पहिला भाग या वर्षाच्या अखेरीस 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून, हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.



संबंधित बातम्या


Brahmastra Nagarjuna Look : ‘अंधकार भी थर थर कांपे’, ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील नागार्जुनचा जबरदस्त लूक पाहिलात का?


Brahmastra Teaser : एका चुकीमुळे आयन मुखर्जीला पुन्हा एकदा पोस्ट करावा लागला ‘ब्रह्मास्त्र’चा टीझर, पाहा नेमकं काय झालं...