Munawar Faruqui Apologises : मुंबईतील एका स्टँडअप कॉमेडी कार्यक्रमादरम्यान मुनव्वर फारुकीने (Munawar Faruqui) वापर केलेल्या शब्दप्रयोगामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलं होतं. कोकणी माणसाविषयी उल्लेख करताना मुनव्वरने शिवीचा वापर केला होता. त्यामुळे त्याच्याविरोधात मनसे आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे नितेश राणे यांनी देखील त्याला इशारा दिला होता. त्यानंतर आता मुनव्वरने सगळ्यांची जाहीर माफी मागितली आहे. 

Continues below advertisement


मुनव्वरने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत कोकणी माणसाची जाहीर माफी मागितली आहे. मुनव्वरने 2021 मध्ये हिंदू देव-देवतांचा अपमान केला म्हणूनही त्याच्या विरोधात तक्रार करण्यात आली. या तक्रारीनंतर मुनव्वरला अटकही  करण्यात आली. त्यानंतर आता या प्रकरणामुळेही त्याच्या विरोधात रोष उठू लागला होता. त्यामुळे मुनव्वरने या सगळ्यावर जाहीर माफी मागितली आहे. 


मुनव्वरने काय म्हटलं?


मुनव्वर फारुकीने त्याच्या सोशल मीडिया एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, 'काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात प्रेक्षकांसोबत काही संवाद सुरु होता, तो जोकही नव्हता. त्याचवेळी कोकणाचा काहीतरी विषय निघाला. मला माहितेय की, तळोज्यात  खूप कोकणी लोकं राहतात आणि माझे खूपही मित्र तिथे राहतात. पण ती लोकांसाठी विषयाच्या बाहेर गेली. लोकांना असं वाटतं की, मी कोकणी लोकांची आणि कोकणाची मस्करी केली असं वाटलं. पण माझा तसा कोणाताही हेतू नव्हता. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, पण तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची जाहीर माफी मागतो.' 






मुन्नवरने नेमकं काय म्हटलं?


मुनव्वरच्या एका कार्यक्रमामध्ये लोकांना तो विचारतो की, सगळे मुंबईचेच आहेत ना? इथे येण्यासाठी कुणी प्रवास करुन आलं आहे का? त्यावर प्रेक्षकांमधून एकाने उत्तर दिलं की, मी तळोजावरुन आलोय. आज मी विचारलं तर तळोजा वेगळं झालं आणि जेव्हा यांच्या गावचे लोक विचारतात की, कुठे राहतात, तेव्हा हे लोकं सांगतात की आम्ही मुंबईला राहतो. ही कोकणी माणसं सगळ्यांना च#$ बनवतात. मुनव्वरच्या या जोकवर प्रेक्षकांमधूनही टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट झाला.                                


ही बातमी वाचा : 


Raja Gosavi : एका कलाकाराची परवड, आश्वासनांचा पूर,अंमलबजावणीचा दुष्काळ; राजा गोसावी यांच्या भावाची उपेक्षा