Mumtaz : बॉलिवूडमधील सीनियर अभिनेत्यांमध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) हे सर्वाधिक हँडसम आणि फिट मानले जातात. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात धाडसी आणि रिअल स्टंट करणारा अभिनेता म्हणूनही 'खिलाडी कुमार' (Akshay Kumar) ओळखला जातो. अक्षयच्या (Akshay Kumar) फिटनेसची गुरुकिल्ली म्हणजे त्यांची शिस्तबद्ध दिनचर्या. आजही अक्षय रोज सकाळी 4 वाजता उठतो आणि रात्री 9 वाजता झोपायला जातो.
अक्षय कुमारच्या या फिटनेस मंत्राचे पालन करणे तितकेसे सोपे नाही, जसे लोक समजतात. मात्र, एकेकाळच्या सुंदर अभिनेत्री मुमताज (Mumtaz) यांनी सांगितले की, अक्षय कुमारमुळेच त्या आज 77 व्या वर्षीही सक्रिय आणि ऊर्जावान आहेत. मुमताज (Mumtaz) यांच्या सौंदर्य आणि तंदुरुस्तीचं रहस्य म्हणजेच अक्षय कुमारकडून मिळालेला फिटनेस मंत्र. चला, जाणून घेऊया त्यांच्या वयाच्या 77 व्या वर्षी देखील फिट असण्याचं हे गुपित.
मुमताज करतात अक्षयचा नियम फॉलो
मुमताज म्हणाल्या की, तरुण आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शिस्त आवश्यक आहे. आता मुमताजही अक्षय कुमारसारख्याच वेळेवर झोपतात आणि लवकर उठतात. त्यांचं मत आहे की, जर दिवसाची सुरुवात चांगली झाली, तर संपूर्ण दिवस आरोग्यपूर्ण जातो.
त्या रात्री उशिरापर्यंत जागत नाहीत आणि साधारणतः 9 ते 10 दरम्यान झोपतात. सकाळी उठल्यानंतर त्या एक कप काळा चहा घेतात, त्यानंतर सौम्य व्यायाम, योगा आणि चालणे करतात. त्यांनी सल्ला दिला आहे की, प्रत्येकाने स्वतःसाठी दररोज एक तास वेळ द्यावा.
मुमताज यांचा डाएट प्लॅन
चेहऱ्याचं सौंदर्य टिकवण्यासाठी मुमताज केमिकलयुक्त ब्यूटी प्रॉडक्ट्सपासून दूर राहतात. केस घनदाट आणि सुंदर ठेवण्यासाठीही त्या कॉस्मेटिक वापरत नाहीत. एवढंच नाही, तर त्या स्वतःचे फेस मास्क घरीच तयार करतात.
मुमताझ डाएट प्लॅन असा आहे :
सकाळी एक कप काळी चहा
सामान्य न्याहारी
दुपारी देखील साध्या पद्धतीचं जेवण
रात्री जेवणाऐवजी फक्त फळं घेतात
अक्षय कुमारच्या सल्ल्यानुसार मुमताज संध्याकाळी 6:30 नंतर काहीही खात नाहीत. स्वतः अक्षय कुमारही हा दिनक्रम पाळतो. त्यांचं म्हणणं आहे की, रात्रीचं जेवण पचायला वेळ लागतो आणि जर जेवण पचलं नाही, तर झोपेमध्ये अडथळा निर्माण होतो. झोप पूर्ण न झाल्याने माणूस दिवसभर थकल्यासारखा वाटतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या