Farming in India : भारताची सुप्रसिद्ध स्वदेशी कंपनी पतंजली आयुर्वेदचा दावा आहे की ती शेतकऱ्यांना मदत करण्यात आणि गावांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात मोठे योगदान देत आहे. आम्ही सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देतो आणि निष्पक्ष व्यापाराद्वारे शेतकऱ्यांचे जीवन सुधारत आहोत असं कंपनीने म्हटलं आहे. पतंजलीचा किसान समृद्धी कार्यक्रम शेतकऱ्यांना सेंद्रिय खते, चांगले बियाणे आणि कीटकांपासून संरक्षण करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देतो. यामुळे मातीचा पोत वाढतो आणि पर्यावरणाला हानी पोहोचत नाही.
कंपनीचा दावा आहे की, "पतंजलीचे व्यवसाय मॉडेल शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी योग्य किंमत देते. कंपनी मध्यस्थांना दूर करून थेट शेतकऱ्यांकडून पिके खरेदी करते, ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढते. तसेच, पतंजलीची कंत्राटी शेती योजना शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा देते. यामुळे शेतकऱ्यांना फायदाच होत नाही तर गावांमध्ये रोजगार आणि विकासालाही चालना मिळते."
कंपनीचे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही पाऊल
कंपनीने म्हटलं आहे की, "पतंजलीने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. कंपनीने शेतकऱ्यांसाठी डिजिटल अॅप्लिकेशन तयार केले आहेत, जे जमीन, हवामान परिस्थिती आणि बाजारभाव याबद्दल माहिती देतात. ही साधने शेतकऱ्यांना चांगली शेती करण्यास आणि बाजारात टिकून राहण्यास मदत करतात. पतंजलीच्या ऑरगॅनिक प्रोमसारखी उत्पादने मातीचे पोषण करतात आणि सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त आहेत."
शेतकऱ्यांना आर्थिक फायदा
कंपनीचा दावा आहे की, पतंजलीचा हा प्रयत्न शेती बदलत आहे आणि पर्यावरणाचे रक्षणही करत आहे. कंपनीच्या योजनांमधून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळत आहे आणि त्यांच्या सामाजिक जबाबदाऱ्याही पूर्ण होत आहेत. अशा प्रकारे, पतंजलीच्या नवीन पद्धती आणि निष्पक्ष व्यापार भारतीय शेतीला नवीन उंचीवर घेऊन जात आहेत.